Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; पार केला १०० कोटींचा आकडा
बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करण्याची सुरुवात विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने केली होती. अल्पावधीतच या चित्रपटाने ६०० कोटींचा टप्पा पार केला होता. आता त्यानंतर अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाने छप्पर फाड कमाई केली आहे. १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. जाणून घेऊयात ‘रेड २’ च्या कमाईबद्दल…. (entertainment)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘रेड २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी १२ कोटी, तिसऱ्या दिवशी १८ कोटी, चौथ्या दिवशी २२ कोटी, पाचव्या दिवशी ७.५ कोटी, सहाव्या दिवशी ७ कोटी, सातव्या दिवशी ४.७५ कोटी, आठव्या दिवशी ५.२५ कोटी कमवत पहिल्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ९५.७५ कोटी कमावले आहेत. तर नवव्या दिवशी ५ कोटी, दहाव्या दिवशी ८.२५ कोटी, अकराव्या दिवशी ११.७६ कोटी कमवत चित्रपटाने एकूण १२०.७५ कोटींची कमाई केली आहे. (Raid 2 box office collection)
================================
हे देखील वाचा: Raid 2 : “नया शहर और नई रेड…”; अजय देवगण पुन्हा ‘रेड’ मारणार!
=================================
‘रेड २’ चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत असून सौरभ शुक्ला, अमित सियाल, रजत कपूर आणि वाणी कपूर यांच्याही महत्वपुर्ण भूमिका आहेत. २०१८ साली आलेल्या रेड चित्रपटाचा रेड २ हा सीक्वेल असून पहिल्या भागा इतकीच चित्रपटाला प्रेक्षकांची प्रसंती मिळत आहे. दरम्यान, चित्रपटाचा शेवट पाहता रेड ३ देखील येऊ शकतो अशी हिंट दिग्दर्शकाने दिली आहे. त्यामुळे ताऊजी (सौरभ शुक्ला), दादाभाई (रितेश देशमुख) यांच्या घरावर रेड मारल्यानंतर ७६ वी रेड अमय पटनायक कुणाच्या घरी मारणार हे कदाचित ‘रेड ३’ मध्ये पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Bollywood tadaka)