
Raid 2 : अमय पटनायक ओटीटीवर ‘रेड’ मारायला लवकर येणार!
विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करत ६०० कोटींचा टप्पा गाठला. आता अजय देवगणच्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकत एक नवा इतिहास रचला आहे. १ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला ‘रेड २’ आता ओटीटी गाजवायला सज्ज झाला आहे. कधी कुठे? जाणून घ्या…(Entertainment)

अमय पटनायक याची ७५ वी रेड यशस्वी झाली असून आता लवकरच प्रेक्षकांना हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे डिजिटल हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले असून नियमानुसार चित्रपट रिलीज होऊन ६० दिवस उलटले की हा चित्रपट ओटीटीवर दाखवला जातो. आणि त्यानुसार जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. (Bollywood news)

‘रेड २’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल बोलायचं झालं तर Sacnilk च्या रिपोर्टनुसार आतापर्यंत चित्रपटाने १६२.१० कोटी कमावले आहेत. ४८ कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने तिप्पट कमाई केली आहे. अजय देवगण 9Ajay Devgan), रितेश देशमुख 9Rireish Deshmukh), सौरभ शुक्ला यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला आहे. (Bollywood masala)
================================
हे देखील वाचा: ‘स्काय फोर्स’ ते ‘रेड २’ बॉलिवूडच्या चित्रपटांचं Box Office Collection!
=================================
२०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’चित्रपटाचा ‘रेड २’ हा सिक्वेल असून चित्रपटाचा शेवट पाहता आगामी काळात ‘रेड ३’ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताऊजी आणि दादा मनोहर हे जेलमधून बाहेर आल्यावर अमय पटनायकसमोर येणार का? अमय पटनायक ७६ वी रेड कोणाच्या घरी मारणार? हे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुत्कता अधिक वाढली आहे. (Raid 2 movie)