
Raid 2 : “मै पांडव नहीं पुरी महाभारत हुं”, रेड २ चा टिझर रिलीज
अजय देवगण याचा २०१८ मध्ये गाजलेला ‘रेड’ (Raid) चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा इन्कम टॅक्स ऑफिसवर अमेय पटनाईक आणखी एक रेड मारण्यास सज्ज झाला आहे. सहा वर्षांनी ‘रेड २’ भेटायला येणार असून चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. नुकताच ‘रेड २’ (Raid 2) चा टिझर प्रदर्शित झाला असून रितेश देशमुख याची भूमिका अजय इतकीच रंजक वाटत आहे. (Bollywood movies)

‘रेड २’चा टीझरची सुरुवात डोंगरावर एक बाईक दिसते. आणि ग्रामीण भागात रेड मारायला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या काही गाड्या दिसतात. यापैकी एका गाडीमध्ये अजय देवगण ((Ajay Devgan) बसलेला असतो. तर दुसरीकडे राजाजी अर्थात रामेश्वर सिंग जेलमध्ये बसून आता पटनाईक कुणाची वाट लावायला गेला आहे याबद्दल चर्चा करताना दिसतो. आणि तेव्हा खुर्चीवर दोन्ही पाय ऐटीत ठेवून बसलेल्या रितेश देशमुखची एन्ट्री होते. अॅक्शन आणि दमदार संवादांनी भरलेला हा टीझर प्रेक्षकंची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचवतो. रेड २ मध्ये अमेय पटनायक त्याच्या कारकीर्दीतील ७५ वी रेड मारायला जातो आणि दादाभाईशी त्याची गाठ पडते. (Raid 2 release date)

टीझरमधील प्रत्येक दृश्य लक्ष वेधून घेताच पण पटनाईक आणि दादाभाई यांच्या फोनवरील संभाषणावेळी “मै पूरी महाभारत हू”, असं अमेय पटनायक दादाभाईला बोलताना दिसतो. एकंदरीत अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांच्या अभिनयाची तुफान जुगलबंदी ‘रेड २’मध्ये १ मे २०२५ रोजी पाहायला मिळणार आहे. ‘रेड २’ (Raid 2) मध्ये अजय देवगण आणि रितेशसह वाणी कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकारही झळकणार आहेत.