Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं विधान
भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil)…. खरं तर खूर कमी काळ त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं पण त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नक्कीच कोरली गेली. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा स्मिता पाटील चर्चेचा विषय ठरल्या असून निमित्त आहे ते म्हणजे त्यांचा मुलगा प्रतीक स्मिता पाटील (Prateik Smita Patil) याने मुलाखतीमध्ये केलेले अनेक खुलासे. आता प्रतीकपाठोपाठ राज बब्बर (Raj Babbar) यांनी स्मिता यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल महत्वाचं विधान केलं आहे.(Entertainment update)

राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांच्यासोबत १९८३ साली लग्न केलं होतं. त्यांना १९८६ मध्ये मुलगा झाला; मात्र, गरोदरपणात काही कॉम्पलिकेशन्स आल्यामुळे स्मिता यांचं काही दिवसांमध्ये निधन झालं. आता त्यांच्या अंतिम क्षणांबद्दल राज बब्बर (Raj Babbar) यांनी रेडीफला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की,”घरातून रुग्णालयात जाईपर्यंत स्मिता सतत माफी मागत होती आणि सगळं ठीक होईल असा मी तिला धीर देत राहिलो. तिने माझ्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहिलं. तिच्या ना नजरेतून मला सगळं काही समजलं होतं. एक तासानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की स्मिता कोमामध्ये आहे.”(Bollywood news)

पुढे राज यांनी त्यांच्या नात्याबद्दल म्हटलं की, “मी तिचाच एक भाग होतो आणि ती माझा भाग होती.तुम्ही कितीही स्ट्राँग असलात तरी अशी व्यक्ती जी तुमचं आयुष्यच आहे ती व्यक्ती जर का जग सोडून गेली तर साहजिकच तुम्हाला तिची आठवत येत राहणार. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या आठवणी माझ्यासोबत असणार आहेत.” (Bollywood tadaka)

दरम्यान, राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नात्यात त्यांच्या पहिल्या पत्नी नादिरा यांच्यामुळे वाद होते असं म्हटलं जातं. शिवाय काही दिवसांपूर्वी प्रतीक स्मिता पाटील (Smita Patil) याने देखील एका मुलाखतीमध्ये आई आणि नादिरा यांच्यातील वादामुळेच वडिल राज बब्बर आणि त्याच्या भावाला लग्नाला न बोलावल्याचं सांगितलं होतं. कारण, प्रतीकने स्मिता पाटील यांनी खरेदी केलेल्या घरात लग्न केलं होतं आणि त्यामुळेच आईसोबत ज्या व्यक्तीचं नातं सुरळीत नव्हतं त्यांना तिथे बोलावणं त्याला योग्य वाटलं नव्हतं. (Bollywood gossips)
================================
=================================
स्मिता पाटील आणि राज बब्बर (Smita Patil and Raj babbar यांनी एकत्रित ‘वारिस’, ‘मिर्च मसाला’, ‘आज की आवाज’, ‘अवाम’, ‘इन्सानियत के दुश्मन’, ‘भीगी पलकें’, ‘जवाब’, ‘अंगारे’, ‘हम दो हमारें दो’, ‘तिसरा किनारा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित कामं केली होती. (Smita Patil And Raj Babbar movies)