Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून टीका केली होती?
अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना या दोघांनी ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ आणि ‘नमक हराम’ या दोन चित्रपटात एकत्र काम केले. यानंतर मात्र हे दोन सितारे कधी एकत्र येऊ शकले नाहीत. अमिताभ बच्चन यांच्या आगमनानंतर राजेश खन्ना यांचा डाऊन फॉल सुरू झाला. ‘जंजीर’(१९७३) नंतर अमिताभने राजेश खन्नां यांचे सुपरस्टार पद काबीज केले. तरी राजेश खन्ना स्वतःला सुपरस्टारच समजत होते. पुढची वीस वर्ष दोघांमधील सुप्त संघर्ष चालूच राहिला. अमिताभ यांनी आपले संस्थान खालसा केले हि सल राजेश यांना आयुष्यभर टोचत होती. त्यामुळे अमिताभ यांच्यावर टीका टिपण्णी करण्याची एकही संधी ते सोडत नसे. (Bollywood)

१९८१ साली अमिताभ बच्चन यांचे सहा चित्रपट प्रदर्शित झाले होते. प्रकाश मेहरा यांचा ‘लावारिस’, मनमोहन देसाई यांचा ‘नसीब’, यश चोप्रा यांचा ‘सिलसिला’, शक्ती सामंत यांचा ‘बरसात कि एक रात’, राकेशकुमार यांचा ‘याराना’ आणि टिनू आनंद यांचा ‘कालिया’. याच वर्षी राजेश खन्ना यांचे चार चित्रपट प्रदर्शित झाले होते. चेतन आनंद दिग्दर्शित ‘कुदरत’, सुरेंद्र मोहन दिग्दर्शित ‘धनवान’, शोमु मुखर्जी दिग्दर्शित ‘फिफ्टी फिफ्टी’ आणि अंबरीश सहगल दिग्दर्शित ‘दर्द’. (Classic indian cinema)

यावर्षी बिग बजेट सिनेमांची एकच गर्दी झाली होती. मनोज कुमार यांचा ‘क्रांती’ हा भव्य दिव्य चित्रपट याच वर्षी आला होता. ‘क्रांती’ त्या वर्षी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये नंबर वन होता. स्टार सन्स यांचे चित्रपट देखील यावर्षी प्रदर्शित झाले होते. यात संजय दत्तचा ‘रॉकी’ तर कुमार गौरवचा ‘लव्ह स्टोरी’ होता. कमल हसनचा ‘एक दुजे के लिए’ याच वर्षी झळकला होता. या वर्षीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन वर नजर टाकली तर टॉप १० चित्रपट होते. ‘क्रांती’,’नसीब’, ‘मेरी आवाज सुनो’, ‘लावारीस’,’लव्ह स्टोरी’, ‘एक दुजे के लिये’, ‘कातिलों के कातिल’, ‘कालिया’ ,’याराना’, आणि ‘रॉकी’; या टॉप १० मुव्हीजमध्ये कुठेच राजेश खन्ना नव्हते. (entertainment tadaka)
==============
हे देखील वाचा : Dharmendra : धर्मेंद्रच्या तीन दशकातील तीस नायिका!
==============
माजी सुपरस्टार राजेश खन्ना यांना आपल्या चित्रपटांकडून खूप अपेक्षा होती पण अमिताभ यांच्या झंजावातात त्यांच्या कुठल्या चित्रपटाचा टिकाव लागला नाही. विशेषतः ‘कुदरत’ कडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. पण त्या वर्षीच्या सर्वाधिक यशस्वी टॉप १० मध्ये राजेश यांचा एकही सिनेमा नव्हता. या नैराश्यातून त्यांनी अमिताभ यांच्या एका एका सिनेमातील डान्सवर सडकून टीका केली होती. (Bollywood gossips)
‘लावारिस’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ‘ मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है…’ या गाण्यात साडी घालून एक्टिंग केली होती. यावर राजेश खन्ना यांनी तुफान टीकास्त्र सोडले होते. उस्मान यासिर यांनी राजेश खन्ना यांच्यावर Rajesh Khanna: The Untold Story of India’s First Superstar हे एक पुस्तक लिहिलं आहे त्यात हा सर्व मजकूर आलेला आहे. राजेश खन्ना यांनी टीका करताना म्हटले होते ,”हे गाणे अतिशय अभिरुची हीन, अश्लील आणि निव्वळ धंदेवाईक आहे. मला जर हा चित्रपट आणि हे गाणे करोडो रुपये देऊन जरी ऑफर झाले असते तरी मी ते केले नसते. कलावंताने आपली स्वतःची डिग्निटी जपलीच पाहिजे!”. (Amitabh and rajesh khanna rivalry)

हे मात्र अगदी खरे आहे. राजेश खन्ना यांनी कधीच महिलांचे कपडे घालून डान्स केला नव्हता. अर्थात राजेश खन्ना यांच्या या विखारी टिकेचा प्रेक्षकांवर काहीही परिणाम झाला नाही सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. ‘लावारिस’ या चित्रपटाचे डायलॉग कादर खान यांनी लिहिले होते, संगीत कल्याणजी आणि या चित्रपटात अमिताभ बच्चन, झीनत अमान, राखी अमजद खान, रंजत सुरेश ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. राजेश खन्ना अमिताभ बच्चन यांना कॉपी करण्याची एकही संधी सोडत नव्हता. अमिताभ बच्चन पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर काही वर्षानंतर राजेश खन्ना देखील राजकारणात आले आणि त्याच्याप्रमाणे खासदार देखील बनले. अमिताभ यांनी ‘चिनी कम’ या चित्रपटात विशीतल्या अभिनेत्री सोबत काम केले, तसेच राजेश खन्ना यांनी देखील ‘वफा’ या २००८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात भूमिका केली होती. (Bollywood news)