Raj Kapoor आणि वहिदा रहमान यांच्या ट्रेनवर विद्यार्थ्यांनी दगडफेक का

Rajesh Khanna यांचा ‘तो’ बोल्ड चित्रपट जो केवळ ९ थिएटर्समध्ये रिलीज झाला पण ठरला सुपरहिट!
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना. (Rajesh Khanna).. त्यांचा अभिनय, स्टाईल आणि त्यांचा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे आणि आजही त्यांचा फॅन बेस काही कमी झाला नाही आहे… राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरुण-तरुणी अक्षरशः वेडे व्हायचे. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर लांब रांगा लागायच्या… बरं. सुपरस्टार असूनही राजेश खन्ना यांना देखील स्ट्रगल करावा लागला होता… त्यांच्या सिनेकारकिर्दित एक काळ असा आला होता की, त्यांचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत आणि त्यावेळी त्यांच्या स्टारडमला फटका बसेल अशी परिस्थीत निर्माण झाली होती… या क्षणाला राजेश यांच्या जीवनात एक चित्रपट आला ज्याने त्यांचं आयुष्याच बदलून टाकलं होतं… कोणता होता तो चित्रपट जाणून घेऊयात…

तर, १९७३ मध्ये ‘दाग’ (Daag Movie) हा चित्रपट रिलीज झाला होता.. ज्यात राजेश खन्ना, शर्मिला टागोर (Sharmila Tagore) आणि राखी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.. चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं यश चोप्रा यांनी… दाग चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये राजेश खन्ना त्यांच्या सुपरस्टारच्या अंदाजात तर शर्मिला टागोर यांनी त्यांच्या ग्लॅमरस अदांनी उपस्थित राहात लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या…

विशेष म्हणजे ‘दाग’ हा चित्रपट यशराज बॅनर्सचा पहिला चित्रपट होता... दाग चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांवी बोल्ड कंटेन्ट प्रेक्षकांसमोर मांडला होता… ८० च्या दशकातील लोकांच्या विचारांप्रमाणे ‘दाग’ची कथा त्या काळाच्या मानानं थोडी बोल्ड मानली गेली होती… यश चोप्रा यांना भीती होती की, हा चित्रपट चांगला चालणार नाही, म्हणून त्यांनी तो केवळ ९ थिएटरमध्ये प्रदर्शित केला. राजेश खन्ना यांनीही हा निर्णय स्वीकारला आणि कमी पैशात चित्रपट करण्यास होकार दिला… मात्र, नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं… ध्यानी मनी देखील नसताना यश चोप्रा यांच्या दाग चित्रपटाने यश यांचं आणि राजेश खन्नांचं नशीब पलटून टाकलं…
================================
हे देखील वाचा : Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?
=================================
यश चोप्रा यांनी दाग चित्रपट जवळपास दीड लाखात तयार केला होता… मात्र, इतकं कमी बजेट असताना आणि केवळ ९ थिएटर्समध्ये रिलीज होऊनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६.५० कोटींचा व्यवसाय केला होता… या चित्रपटानं हे सिद्ध करुन दाखवलं होतं की, योग्य कथा आणि योग्य कलाकार कोणाचंही नशीब बदलू शकतात… ‘दाग’ने राजेश खन्ना यांच्या आधीच्या काही प्रोजेक्ट्सचे अपयशाचे दाग धुवून टाकले आणि पुन्हा एकदा त्यांना सुपरस्टार म्हणून जगासमोर आणलं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi