Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !
भारताच्या सिनेइतिहासातील सर्वात महान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांनी इंडस्ट्रीमध्ये तब्बल ५० वर्ष पूर्ण केली आहेत. त्यातच नुकताच त्यांचा ‘कुली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून रसिक प्रेक्षक आणि खासकरून रजनी फॅन्सकडून त्याला भरभरून प्रेम मिळत आहे. (Rajinikanth)
पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल १५१ कोटींची कमाई करून असा पराक्रम करणारा हा पहिलाच तमिळ चित्रपट ठरला. आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की रजनीकांत हे मूळचे मराठी असून त्यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यात त्यांचं गाव पुण्यातील मावडी काडेपाठार ! पण अनेकांना हा प्रश्न पडलाच असेल की रजनीकांत यांनी तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, इंग्लिश या भाषांमध्ये काम केलं आहे मग मराठी असूनसुद्धा मराठीत काम का केलं नाही ?

तर नुकताच एका मराठी चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टिजर प्रदर्शित झाला आहे, ज्याला भरभरून प्रेम मिळत आहे, तो म्हणजे सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar) ! यामध्ये महेश मांजरेकर, भरत जाधव, सुनील तावडे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे यांची प्रमुख भूमिका आहे. पण सगळ्याचं लक्ष वेधलय लिड रोल करणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांनी! (Rajinikanth)
वयाच्या ८० व्या वर्षी अशी आव्हानात्मक भूमिका त्यांनी केली आहे. अनेक जण याची तुलना कांतारासोबत करत आहेत. तर आधी दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी चक्क रजनीकांत यांना विचारणा करण्यात आली होती. पण रजनीकांत यांनी इतर सिनेमांचे बिझी श्येड्यूल आणि हेल्थ इश्यूजमुळे या चित्रपटासाठी नकार दिला. नाहीतर आपल्याला पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये रजनीकांत पाहायला मिळाले असते. (Rajinikanth)
============
हे देखील वाचा : Rajinikanth : सामान्य माणसाचा बुलंद रुपेरी आवाज!
============
२०१० साली ‘रोबोट’ सिनेमाच्या निमित्ताने रजनीकांत यांनी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. यावेळी रजनीकांत यांनी मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय आपल्या ‘दरबार’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी मराठी सिनेमात काम करायचं आहे, असं सांगितलं होतं. पण तो योग अजूनही जुळून आला नाही. तशी रजनीकांत यांची एका चित्रपटाची फी तब्बल १०० कोटी इतकी असते. तर ‘कुली’साठी त्यांनी २०० कोटी घेतल्याचं बोललं जातयं. या तुलनेत ते मराठीत काम करतील की नाही, याबाबतही शंका आहे. दरम्यान रजनीकांत यांचे मराठी फॅन्स आतुरतेने त्यांची मराठी सिनेमामध्ये झलक पाहण्यासाठी आसुसलेले आहेत.