Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rajinikanth : रजनीकांतचा वन मॅन शो “बाशा” चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण

 Rajinikanth : रजनीकांतचा वन मॅन शो “बाशा” चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण
कलाकृती विशेष

Rajinikanth : रजनीकांतचा वन मॅन शो “बाशा” चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण

by दिलीप ठाकूर 13/01/2025

एखादा “काला” (२०१८) चित्रपट अपवाद करता रजनीकांत (Rajinikanth) चा चित्रपट म्हणजे सबकुछ रजनीकांत एके रजनीकांतचा पाढा. त्या चित्रपटाचे नाव, कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, पोस्टर, इतकेच नव्हे तर त्या मसालेदार मनोरंजक चित्रपटाचे यशापयशही “रजनीकांत” भोवती.

रजनीकांत (Rajinikanth) हे चित्रपट संस्कृतीतील एक लोकप्रिय असे अजब रसायन. त्याचा स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग, फॅन क्लब आहे. प्रत्यक्षात पहाल तर “त्याच्यात इतके आवडण्यासारखे काय आहे” असा प्रश्न पडणारच. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित “एक फुल चार हाफ” या चित्रपटाच्या मुहूर्ताला गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओत मी लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया अरुण यांच्यासाठी आवर्जून हजर राहिलो असतानाच अचानक रजनीकांतचे आगमन झाले आणि त्याच्या शुभहस्ते या चित्रपटाचा मुहूर्त झाल्याचे अनुभवले. हे चांगलेच आठवणीत राहिलयं. एखाद्या सर्वसाधारण माणसासारखे रजनीकांतचे येणे, असणे, पाहणे, दिसणे, वावरणे व निघणे होते. मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम‘च्या मेहबूब स्टुडिओतील मुहूर्ताला स्टेजवर Amitabh Bachchan व गोविंदासोबत पाहिलेला रजनीकांत तेव्हाच्या झगमगाटात स्टार वाटला इतकेच.

अशा रजनीकांत (Rajinikanth) च्या “बाशा” या तमिळ चित्रपटाच्या प्रदर्शनास तीस वर्ष पूर्ण झालीदेखील. हा चित्रपट वर्षभरात हिंदीत डब होऊन आपल्यासमोर आला. त्या काळातील दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होऊन येणे दीड दोन वर्षांनी होई. तोपर्यंत त्यांच्या यशाची हवा तिकडून इकडे येई. चित्रपटसृष्टीच्या ट्रेड पेपर्समध्ये तेलगू, मल्याळम, तमिळ, कन्नड चित्रपटांच्या यशाची माहिती व महती आपल्याला माहीत होण्यापूर्वीच ती जितेंद्रला समजे आणि तो साऊथच्या सुपरहिट चित्रपटाचे अधिकार घेऊन हिंदीतील रिमेकची घोषणा करे. त्या काळात बराच काळ तो हैदराबादला मुक्कामाला असे.

पॅन इंडिया चित्रपट युगात मूळ तमिळ वा तेलगू भाषेतील चित्रपट अन्य भाषेत डब होऊन (त्यात हिंदी असतेच) तो अनेक देशातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचतोय. ग्लोबल युगातील ते मोठेच देणे. एस. एस. राजमौली (S. S. Rajamouli) दिग्दर्शित “बाहुबली द बिगनिंग” (२०१५) च्या खणखणीत सुपर हिट यशाने त्याची सुरुवात झाली. आपल्या देशातील पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटाचीही वाटचाल अशी व इतकी रंजक आहे की अन्य देशातील चित्रपटसृष्टीपेक्षा त्यात वळणे आहेत.

‘बाशा’ (Baashha) तत्पूर्वीचा धमाकेदार मसालेदार चित्रपट. त्याची गोष्ट कशी सुचली यामागेही एक विशेष गोष्ट. ‘अन्नामलाई‘ (१९९२) या तमिळ भाषेतील चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक सुरेश कृष्णा व रजनीकांत (Rajinikanth) यांच्या रंगलेल्या गप्पांत Mukul S. Anand दिग्दर्शित “Hum” चा विषय निघाला आणि त्यात काही वगळला गेलेला भाग रजनीकांतने सुरेश कृष्णा यास सांगितला. त्याभोवतीच पटकथा विणली तर? दिग्दर्शकाला असे काही हवेच असते आणि सुरेश कृष्णाने ‘बाशा’ लिहिला.

ही गोष्ट एका रिक्षा चालकाची तसेच एका गॅन्गस्टरचीही. रजनीकांत एक रिक्षाचालक आहे. आपली आई व दोन बहिणी भावासह राहतोय. बहिणीचे लग्न तिच्या श्रीमंत प्रियकराशी लावून देतो. तर भाऊ पोलीस इन्स्पेक्टर बनतो. एका बहिणीला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश तर मिळतो. पण…? आपल्या पूर्व आयुष्यातील एक गोष्ट नायक रजनीकांतने आपल्या कुटुंबापासून लपवलीय. तीच एक दिवशी अचानक समोर येते आणि चित्रपट वेगळे वळण घेतो. (Entertainment mix masala)

आता रजनीकांत (Rajinikanth) ची फुल्ल ॲक्शन. प्रचंड मोठा ड्रामा घडतो. रजनीकांतच्या अंगात साहस संचारते आणि चित्रपट अधिकाधिक मारधाडपट बनतो. तर्काच्या कसोटीवर हे तपासायचे नसते. मूळ कथासूत्र न सोडता हे सगळे घडते. तेच रजनीकांतच्या निस्सीम चाहत्यांना हवे असते. रजनीकांतकडून त्यांच्या काही तडक भडक अपेक्षा असत आणि मग चित्रपट प्रदर्शित व्हायच्या शुक्रवारी (बाशा १२ जानेवारी १९९५ रोजी चेन्नईत प्रदर्शित झाला) भल्या पहाटेच ढोल ताशाच्या गजरात त्याचे निस्सीम चाहते थिएटरवर येत आणि रजनीकांतच्या भव्य दिमाखदार कटआऊटला दूधाने आंघोळ घालत. तिकडच्या चित्रपट रसिकांची ही संस्कृती कालांतराने मुंबईतही आली. ती साऊथच्याच चित्रपटासाठी आली. साऊथचा चित्रपट एन्जाॅय करणे म्हणजे एक प्रकारचे सेलिब्रेशन असते.

बाशा हा रजनीकांत (Rajinikanth) च्या अनेक सुपर हिट चित्रपटातील एक. (त्याची ढिश्यूम ढिश्यूम असलेले काही मसालेदार मनोरंजक चित्रपट गल्ला पेटीवर अपयशीदेखील ठरलेत तो वेगळाच विषय). संपूर्ण पोस्टरभर रजनीकांत हे “बाशा” सारख्या धमाकेदार पिक्चरचे वैशिष्ट्य. या चित्रपटात नगमा त्याची नायिका. हिंदीत फार काही चमकधमक न दाखवलेली नगमाने साऊथच्या चित्रपटातही भूमिका साकारल्या. याशिवाय “बाशा” मध्ये रघुवरन, गनराज, आनंदराज, चरणराज इत्यादींच्या प्रमुख भूमिका. (Untold stories)

रजनीकांत (Rajinikanth) च्या सुपरहिट चित्रपटांची हिट लिस्ट बरीच मोठी. याचं कारण त्याचा स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग. कष्टकरी मेहनती कामगार, स्वप्नाळू रसिक, पडद्यावरच्या जगात हरवून व हरखून जाण्याची भावना असणारे भाबडेपण हे रजनीकांतच्या चित्रपटांना हुकमी गर्दी करणारच. रजनीकांतची सिगारेट ओढण्याची स्टाईल असो वा डोळ्यावर गाॅगल चढवण्याची शैली असो, त्यात ते अनेक वर्ष गुंतत आलेत. रजनीकांत त्याना असाच हवा. तो असाच भन्नाट व अतिशयोक्तीपूर्ण असू शकतो यावर त्यांची जणू श्रध्दा.

============

हे देखील वाचा : Mela : मेला चित्रपटाची पंचवीशी ना धड “कारवा”, ना “शोले”

============

आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीतील हा एक महत्वाचा घटक. त्याला कोणी हसले वा कोणी हसण्यावारी नेले तरी त्यापेक्षा महत्वाचे आहे ते फर्स्ट शोपासूनच रजनीकांतमय पिक्चर हमखास हाऊसफुल्ल गर्दीत एन्जाॅय केले गेले. चित्रपटाची गुणवत्ता महत्वाची असतेच पण त्याचे खणखणीत व्यावसायिक यश चित्रपट या माध्यम व व्यवसायाला प्रचंड मोठी सपोर्ट सिस्टीम ठरते. रजनीकांत (Rajinikanth) म्हणूनच स्टार म्हणून ओळखला जातोय. बाशा त्यातीलच एक चित्रपट. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होऊन येणे हे अगदी रोजा, मेयरसाब, अप्पू राजा, दलपती अशा अनेक चित्रपटांपासून सुरु असतानाच बाशा आला आणि तमिळप्रमाणेच हिंदीतही यशस्वी ठरला. चित्रपटाच्या जगात यश हेच चलणी नाणे म्हणून या यशावर फोकस हवाच. होय ना?

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Amitabh Bacchan baasha Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured Laxmikant Berde priya berde Rajinikanth s. s. rajamouli
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.