Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Rajinikanth : ५ इंडस्ट्रीचे ५ दिग्गज एकत्र… ‘कुली’ १००० कोटी कमावणार?
५० वर्ष झाली पण एका माणसाची क्रेझ काही आजही कमी झालेली नाही, ते म्हणजे सुपरस्टार रजनीकांत… सध्या त्यांच्या आगामी ‘कुली (Coolie Movie)’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे… आता रजनीकांत यांचा विषय आहे, तर चित्रपटाची हवा तर असणारच पण या चित्रपटात अजून काही खास गोष्टी आहेत, ज्यामुळे सिनेप्रेमी आतुरतेने याची वाट पाहत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हा चित्रपट ‘मास्टर’, ‘कैथी’, ‘विक्रम’ आणि ‘लिओ’ फेम लोकेश कनगराज यांनी डायरेक्ट केलेला आहे. त्यांच्या लोकी यूनिव्हर्समुळे आधीच त्यांनी आपला एक वेगळा फॅनबेस बनवून ठेवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारताच्या ५ सिने इंडस्ट्रीमधले ५ दिग्गज या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. स्वत: सुपरस्टार रजनीकांत हे तमिळ म्हणजेच कॉलीवूडमधले, नागार्जुन हे तेलुगू म्हणजेच टॉलिवूडमधले, उपेंद्र हे कन्नड म्हणजेच सॅंडलवुडमधले, सौबिन शाहीर हे मल्याळम म्हणजेच मॉलिवूड मधले आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे हिंदी म्हणजेच बॉलिवूडमधले असे ५ दिग्गज एकाच मूव्हीमध्ये झळकणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे आमिर खान पहिल्यांदाच साऊथच्या मूव्हीमध्ये आपली छाप उमटवणार आहे. मागे एका इंटरव्यूमध्ये त्याने या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल माहिती दिली होती. या कलाकारांव्यातिरिक्त ‘कुली’मध्ये सत्यराज आणि श्रुती हासन यांचीही विशेष भूमिका आहे. २ वर्षांपूर्वी लोकेश कनगराजने या मुव्हीची announcement केली होती आणि येत्या १४ ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये धडकणार आहे. तमिळ इंडस्ट्रीच्या इतिहासात आजपर्यंत एकही चित्रपट १००० कोटींचा टप्पा पार करू शकलेला नाही. पण कुली हा चित्रपट हा टप्पा गाठू शकतो, असं फिल्म क्रिटिक्सचं म्हणणं आहे. सन पिक्चर्सने हा मुव्ही प्रोड्यूस केला असून अनिरुद्धचं जबरदस्त म्युझिक आपण यामध्ये अनुभवणार आहोत. तसं पहायला गेलं तर तमिळ इंडस्ट्रीमधले हायेस्ट grossing मुव्ही ‘२.०’ आणि ‘जेलर’ हे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या दोघांमध्ये आपल्याला सुपरस्टार रजनीकांतचा swag पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आता रजनीसर स्वत: आपलाच रेकॉर्ड तोडून तमिळ इंडस्ट्रीची वन थाउजंड करोड मध्ये एन्ट्री करतील का ? याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत.

खरं तर, रजनीकांत यांच्यासह कमल हासन, विजय, अजिथ कुमार असे सुपरस्टार्स असूनही तमिळ चित्रपटसृष्टीतील एकही चित्रपट १००० कोटींच्या कल्बमध्ये सहभागी झाला नाही हे आश्चर्यच आहे… त्यामुळे आता रजनीकांत यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या असल्यामुळे कुली चित्रपट फार महत्वाचा ठरणार आहे… त्यातही या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय लोकेश कनगराज यांनी… ज्यांनी आत्तापर्यंत केवळ ५ चित्रपट डिरेक्ट केले आहेत; पण प्रत्येक चित्रपट हिट झाला आहे… इतकंच नाही तर भक्कम कथानक आणि त्याची वास्तववादी मांडणी यावर भर देणारे लोकेश त्यांच्या Lokesh Cinematic Universe मध्ये ८ ते १० चित्रपटच बनवणार असून येत्या काळातील नव्या उमद्या दिग्दर्शकांना त्यांना यानिमित्ताने पुढे आणायचं आहे…
================================
हे देखील वाचा: Tabu : वयाने १२ वर्ष मोठ्या असलेल्या ‘या’ सुपरस्टारच्या आईची साकारली भूमिका
=================================
एकीकडे बॉक्स ऑफिसच्या गर्दीत बॉलिवूड, कन्नड, तेलुगु चित्रपटांनी १००० कोटींचा टप्पा पार केला असून;ज्या कलाकाराची जगात हवा आहे अशा रजनीकांत यांच्या कुली या तमिळ चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा पार केलाच पाहिजे असा अट्टाहास त्यांच्या प्रत्येक चाहत्याचा नक्कीच आहे… अशातच बॉलिवूडमधला १००० कोटींचा टप्पा पार करणाऱ्या दंगल चित्रपटाती अभिनेते आमिर खान असल्यामुळे अधिक Push चित्रपटाला मिळेल असं म्हटलं तरी हरकत नाही… मात्र, कुली चित्रपट रजनीकांत यांच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत नक्कीच सहभागी झाला आहे हे निश्चित…
-सागर जाधव