
Maalik : राजकुमार रावच्या मालिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा?
अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याने त्याच्या सढळ अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे… अगदी ‘स्त्री’ मधला विकी असो किंवा ‘श्रीकांत’ असो.. प्रत्येक भूमिकेत त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे… आणि आता सध्या ‘मालिक’ (Maalik Movie) या चित्रपटामुळे तो विशेष चर्चेत असून यात त्याचा राऊडी लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय… ११ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केलीये जाणून घेऊयात…

सॅकनिल्कच्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी ३.७५ कोटी, दुसऱ्या दिवशी ५.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी ५.२५ कोटी, चौथ्या दिवशी १.६५ कोटी कमवत आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण १५.९० कोटी कमावले आहेत. (Maalik Movie box office collection)
================================
हे देखील वाचा: Rajinikanth : ५ इंडस्ट्रीचे ५ दिग्गज एकत्र… ‘कुली’ १००० कोटी कमावणार?
=================================
काही दिवसांपूर्वी राजकूमार राव याचा ‘भूल चुक माफ’ चित्रपट रिलीज झाला होता… मात्र, ‘स्त्री’ चित्रपटानंतर राजकूमार राव याचे चित्रपट फारसे चालले नाहीत हे देखील तितकंच खरं आहे…त्यामुळे आता येत्या काळात राजकूमार राव जरी विविध विषय, आशय असणारे चित्रपट घेऊन आला तरी बॉक्स ऑफिसवर त्याचा किती टिकाव लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे… तसेच, काही दिवसांपूर्वी राजकूमार राव आणि पत्रलेखा यांनी आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
================================
हे देखील वाचा: R Madhvan : “मी तामिळ असूनही मला मराठी…”; मराठी-हिंदी भाषा वादात अभिनेता काय म्हणाला?
=================================