Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील;

लग्नाच्या वाढदिवशीच घरी आली लक्ष्मी! Rajkumar Rao-Patralekha झाले आईबाबा
२०२५ हे वर्ष बॉलिवूड कपल्ससाठी फार स्पेशल ठरलं आहे… विकी-कॅटरिना, सिद्धार्थ-कियारा, परिणीती-राघव नंतर आता आणखी एका कपलच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे…. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना गोंडस मुलगी झाली असून विशेष म्हणजे त्यांच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांना कन्यारत्न झालं आहे… (Rajkumar rao & Patralekha Baby)
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना मुलगी झाली असून त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे… राजकुमारने पोस्ट करत लिहिलं आहे की, “आमच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी देवाने दिलेलं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे”… (Entertainment News)

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्न केलं होतं… आणि काही महिन्यांपूर्वी त्यांनी लवकरच ते आई-बाबा होणार असल्याची गुडन्यू सांगितली होती… त्यांच्या घरी लक्ष्मी आल्यामुळे चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी राजकुमार आणि पत्रलेखा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत…
================================
================================
नुकताच राजकुमार ‘भूल चूक माफ’ आणि ‘मालिक’ या चित्रपटांमध्ये झळकला होता… तसेच, तो अॅड उज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची तयारी करत असून यात राजकुमार निकम यांची भूमिका साकारणार आहे… तर, पत्रलेखा ‘फुले’ (Phule Movie) चित्रपटात झळकली होती आणि यात तिने सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली होती…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi