
Rajkumar Rao-Patralekha यांनी लेकीचं ठेवलंय ‘हे’ नाव, हिंदू संस्कृतीशी नावाचं आहे खास नातं!
बॉलिवूडमध्ये बऱ्याच फेमस सेलिब्रिटींनी गेल्या काही वर्षांत लग्न केली तर काहींना गोंडस बाळं देखील झाली. याच यादीत नावं येतं ते म्हणजे अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha). विशेष म्हणजे दोघांच्या लग्नाच्या वाढदिवशीच त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं होतं. आणि आता दोघांनी आपल्या चिमुकल्या लेकीचा हात हातात घेत एक फोटो शेअर केला आहे. इतकंच नाही तर लेकीचं युनिक नावंही त्यांनी चाहत्यांसमो रिव्हील केलं आहे. (Bollywood News)

राजकुमार राव आणि पत्रलेखा या सेलिब्रिटी जोडप्याने इतर कलाकारांप्रमाणेच आपल्या लेकीचं युनिक पण आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवणारं नाव ठेवलं आहे. त्यांनी लेकीचं नाव ठेवलं आहे पार्वती. सोशल मिडियावर लेकीचा हात हातात घेत त्यांनी फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ”अत्यंत नम्रपणे हात जोडून आणि मनापासून आम्ही आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या आशीर्वादाची तुम्हाला ओळख करुन देत आहोत. पार्वती पॉल राव” (Parvati Paul Rao), अशा शब्दांत त्यांनी लेकीच्या नावाचा उलगडा केला. (Patralekha Daughter Name)

खरं तर, सध्या आई-वडिलांचं एकत्रित नाव करुन मुलांची नावं ठेवण्याचा ट्रेण्ड सुरु असताना सेलिब्रिटी कपल्स मात्र विचारपुर्वक आपल्या बाळांची नावं ठेवत आहेत. बरं, बऱ्याचजणांना मुलीच्या नावात ‘पॉल’ कुठून आलं असा प्रश्न पडला असेल. तर, पत्रलेखा हिचं माहेरच आडनाव ‘पॉल’ असून राजकुमारने त्याचा आदर ठेवत मुलीचं नाव पार्वती पॉल राव अशी त्यांनी मुलीची ओळख करुन दिली आहे. (Bollywood)
================================
हे देखील वाचा : “तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालाय”; रितेश भाऊंनी घेतली Tanvi Kolte हिची शाळा
================================
काही सेलिब्रटींच्या बाळांची नावं जाणून घेऊयात. विकी कौशल आणि कॅटरिना कैफ (Vicky Kaushal & Katrina Kaif) यांच्या मुलाचं नाव आहे विहान. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या मुलाचं नाव आहे नीर, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara Advani & Siddharth Malhotra) यांच्या मुलीचं नाव आहे सरायाह. त्यामुळे आता कलाकारांनी त्यांच्या मुलांची ठेवलेली युनिक नावं पाहता येत्या काळात आपल्या संस्कृतीशी जोडलेली मुलांची नाव ठेवण्याचा नवा ट्रेण्ड येणार यात शंकाच नाही. (Bollywood Celebrity Couple Baby’s Name)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi