Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

Ujjwal Nikam Biopic: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झळकणार !
भारतीय न्यायव्यवस्थेतील एक अत्यंत प्रभावशाली नाव म्हणजे उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam). अनेक गुन्हेगारी खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी दाखवलेली हुशारी आणि धाडस आजही लोकांच्या स्मरणात आहेत. आता त्यांची ओळख केवळ कायदेतज्ज्ञ म्हणून नाही, तर खासदार म्हणूनही होत आहे. राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून त्यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाली असून, राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून उमेदवारी दिली होती. जरी त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला, तरी आता राज्यसभेच्या निमित्ताने त्यांना संसदेत जाण्याची संधी मिळाली आहे. आणि अशाच वेळी त्यांच्या जीवनावर आधारित एक भव्य चित्रपटही साकारला जात आहे.(Ujjwal Nikam Biopic)

या बायोपिकच्या माध्यमातून उज्ज्वल निकम यांची कथा आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मॅडॉक फिल्म्स ही नामांकित निर्मितीसंस्था या चित्रपटाची निर्मिती करत आहे. दिग्दर्शनाची धुरा ‘पाताल लोक’ आणि ‘स्कूप’ सारख्या चर्चेत असलेल्या वेबसीरिजचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी स्वीकारली आहे. या बायोपिकबद्दल गेल्या काही काळात अनेक चर्चांना उधाण आले होते. विशेषतः, निकम यांच्या भूमिकेसाठी कोणता अभिनेता योग्य ठरेल यावर बरीच चर्चा केल्या जात होत्या. याआधी आमिर खानचे नाव पुढे आले होते, मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही भूमिका अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) साकारणार आहे.

राजकुमार राव हा सध्या बॉलिवूडमधील अत्यंत व्यग्र आणि यशस्वी अभिनेता मानला जातो. ‘स्त्री 2’ सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर त्यांच्या करिअरला नवीन गती मिळाली आहे. ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’, ‘भूल चूक माफ’, ‘मालिक’ आणि सौरव गांगुली यांची बायोपिक यानंतर आता उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही त्यांच्या खात्यात जमा झाला आहे. हा चित्रपट प्रामुख्याने 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट, तसेच 2008 च्या 26/11 हल्ला यांसारख्या खटल्यांभोवती फिरणार आहे, जिथे निकम यांनी सरकारी वकील म्हणून निर्णायक भूमिका बजावली होती. या चित्रपटासाठी राजकुमार राव विशेष प्रशिक्षण घेणार असून, वकिलाच्या भूमिकेत शिरण्यासाठी अभिनय कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.(Ujjwal Nikam Biopic)
================================
================================
चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून, निर्मात्यांचे लक्ष्य मार्च 2026 पर्यंत संपूर्ण शूटिंग पूर्ण करण्याचे आहे. सर्व काही नियोजनानुसार झाले, तर हा चित्रपट 2026 च्या उत्तरार्धात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय न्यायव्यवस्थेतील एक थोर पुरुष, त्यांचा संघर्ष, यशस्वी न्यायालयीन लढाया आणि न थकता चालणारी सेवाभावना यांची साक्ष प्रेक्षकांना मिळणार आहे. उज्ज्वल निकम हे नाव आता केवळ कायदेतज्ज्ञ, खासदार किंवा वकील या ओळखीत अडकणार नाही, तर रुपेरी पडद्यावरही आपली छाप सोडणार यात शंका नाही.