Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी आली ‘ती’

 सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी आली ‘ती’
मिक्स मसाला

सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी आली ‘ती’

by रसिका शिंदे-पॉल 17/02/2026

महाराष्ट्रातील घराघरांत फक्त मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनचीच चर्चा सुरु आहे. काहींना घरातील सदस्यांचा खेळ आवडतोय तर काहींना काही सदस्य फारच खटकतायत. घरात राखी सावंत हिची एन्ट्री झाल्यानंतर त्सुनामी आली. तिच्यापुढे प्रत्येक सदस्य हक्केब्के झाले होते. आणि या ड्रामा क्वीनचं घरातील तंटा क्वीन रुचिता जामदारसोबत कडाक्याचं भांडण झालं आणि राखीने थेट तिच्या बेडवर कचरा टाकला. यावरुन बिग बॉस नाराज झाले असून त्यांनी घरात आता नवा ट्विस्ट आणला आहे. पण त्या आधी नेमकं घरात काय झालं होतं ते जाणून घेऊयात… (Big Boss Marathi Season 6)

तर, झालं असं की, घरात भांडी घासली नव्हती, किसन फारचं अस्वच्छ होता. यावरुन राखीने वाद सुरु केला. राखी सगळ्यांना कामचोर म्हणाली आणि यावेळी दीपाली तिच्याबाजूने टोळीशी भांडत होती. किचनच्या एका कोपऱ्यात राखीला कचरा दिसला आणि तिने तो कचरा आणून रुचिता, रोशन बसलेल्या ठिकाणी टाकला. यानंतर रुचिताने तोच कचरा आणून राखीच्या बेडवर टाकला. यावरुन तन्वीने रुचिताला सुनावलं आणि दुसरीकडे दीपालीने नाश्ता न बनवण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या गोंधळात विशालने जाऊन राखीच्या बेडवरचा कचरा उचलला. पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही तर राखीने पुन्हा दुसरा कचरा घेऊन रुचिताच्या बेडवर टाकला. (Rakhi Sawant)

================================

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 6: ‘हो, मला रुचिता आवडते’, अखेर विशालने दिली प्रेमाची कबुली, पण दिपालीच्या टोमण्याने रुचिता भडकली!

================================

यानंतर घरात रुचिता आणि प्रभूमध्येही बरेच वाद झाले. यामुळे चिडलेल्या बिग बॉसनी राखीला कन्फेशन रुममध्ये बोलावलं आणि तिला खडेबोल सुनावले. राखीला शिक्षा देत बिग बॉस म्हणाले, ‘आपली या घरात जागा नाही’ बिग बॉसची टीम येते आणि राखीला घेऊन जाते. राखीला दुसऱ्या खोलीत ठेवतात. बिग बॉसच्या घराचा कारभार सांभाळण्यासाठी तंटोजीराव भांडकुदळे यांची उत्तराधिकारी म्हणून राखी सावंतची निवड करतात. जोपर्यंत बिग बॉसच्या घराचा कॅप्टन होत नाही, तोपर्यंत राखी घराचा ताबा घेईल, असं बिग बॉसनी सांगितलं. आता घराचा ताबा राखीच्या हातात आल्यामुळे काय होणार हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उस्तुक आहे. (Ruchita Jamdar)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: big boss big boss 6 big boss marathi season 6 Bollywood Chitchat bollywood update Rakhi Sawant ruchita jamdar tanvi kolte
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.