‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
Ramayan:’आदिपुरुष’ला टक्कर देण्यासाठी पुन्हा सुरु होणार रामानंद सागर यांचे ‘रामायण’
प्रभास स्टारर ‘आदिपुरुष‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी जी क्रेझ दिसली होती, पण त्या नंतर तो सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला. व्हीएफएक्स, संवाद आणि स्टार्सच्या वेशभूषेवरून चित्रपट निर्मात्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. वाढता वाद पाहून निर्मात्यांनी चित्रपटाचे संवाद बदलले, पण हा विरोध थांबताना दिसत नाही. चित्रपटाचे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. निर्मात्यांवर रामायणाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला असून त्याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर स्पष्टपणे दिसून येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर रामानंद सागर यांचे ‘रामायण‘ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘रामायण’ या मालिकेत काम केलेल्या कलाकारांनीही ‘आदिपुरुष’ला आक्षेप घेतला आहे.(Ramayan)
रामानंद सागर यांची प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘रामायण‘ पुन्हा एकदा चाहत्यांसाठी टीव्हीवर पुनरागमन करत आहे. शेमारू टीव्हीने घोषणा केली आहे की, पौराणिक मालिका 3 जुलै 2023 पासून प्रसारित केली जाईल. 80 च्या दशकातील टीव्ही शोमध्ये अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी राम आणि सीतेच्या व्यक्तिरेखा साकारून लोकांच्या मनावर राज्य केले होते. सुनील लाहिरी यांनी लक्ष्मणची भूमिका साकारली होती.आदिपुरुषावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित होत आहे. अरुण गोविल (राम) आणि दीपिका चिखलिया (सीता) यांचा हा शो ३ जुलैपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. शेमारू टीव्हीने इन्स्टाग्रामवर याची अधिकृत घोषणा करत लिहिले की, ‘आम्ही तुम्हा सर्वप्रिय प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत जगप्रसिद्ध पौराणिक मालिका ‘रामायण’. पाहा ‘रामायण’ ३ जुलैपासून संध्याकाळी ७.३० वाजता शेमारू टीव्हीवर.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ची तुलना ‘आदिपुरुष’ या नव्या चित्रपटाशी केली जात असताना ‘रामायण’चे पुन्हा प्रक्षेपण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘रामायण’ या हिंदू महाकाव्यावर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर जोरदार टीका होत आहे. चित्रपटात राम, सीता, हनुमान आणि रावणाचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन, देवदत्त नागे आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.(Ramayan)
==============================
हे देखील वाचा:
===============================
आता ३ जुलै पासून संध्याकाळी ७.३० वाजता शेमारू टीव्हीवर आपल्याला ‘रामायण’ चाआनंद घेता येणार आहे .कोरोनाच्या पहिल्या लाटेत ‘रामायण’ पुन्हा एकदा दूरदर्शनवर प्रसारित झाले होते आणि तेव्हा ही या मालिकेला पुन्हा एकदा ८० च्या दशकाइतकेच प्रेम प्रेक्षकांकडून मिळाले होते.