Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!
नमित मल्होत्रा निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramanaya Movie) या बॉलिवूडच्या पहिल्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक अखेर समोर आली आहे… या चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सीता मातेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) झळकणार आहे… ‘रामायण’ या काव्याचं मोठ्या पडद्यावरील हे भव्य सादरीकरण प्रेक्षकांचं मन जिंकणारं आहे…(Bollywood News)

‘रामायण’ चित्रपटाच्या टायटल अनाऊंसमेंट व्हिडिओची सुरुवात ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या अवतारांची ओळख करुन देत होते… पुढे श्रीराम आणि रावण यांची ओळख करुन देताना प्रभू श्री राम म्हणजे धर्म आणि बलिदान तर रावण म्हणजे ताकद आणि सुड भावना असं म्हटलं आहे… तर अशा या प्रभू श्रीराम आणि रावणाची अमर कथा म्हणजे रामायण (Ramayana Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… चित्रपटाची पहिलीच अनाऊसमेंट व्हिडिओ अक्षरश: अंगावर काटा आणणारी आहे. दरम्यान, रणबीर कपूर आणि यश यांची छोटीशी झलक पुन्हा आपल्याला हजारो वर्ष मागे घेऊन जाणर हे निश्चित आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमधला हा पहिला बिग बजेट पौराणिक चित्रपट असून या चित्रपटाच्या संगीतांसाठी ए.आर.रेहमान आणि हॅम्स झिमर एकत्र आले आहेत…(Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित आहेत का?
=================================
श्रीधर राघवन यांचं लिखाण असणाऱ्या‘ रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीराम रणबीर कपूर, सीता माता साई पल्लवी, लक्ष्मण रवी दुबे, हनुमान सनी देओल, रावण यश हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत… तसेच, ८ वेळा अॅकेडमी पुरस्कार विजेते DNEG या VFX स्टुडिओने चित्रपटातील तांत्रिक आणि व्हिएफक्सची जबाबदारी उचलली आहे… त्यामुळे अर्थातच अव्वल दर्जाचे ग्राफीक्स चित्रपचात दिसणार यात शंकाच नाही… दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु असणारा रामायण चित्रपट ऑफिशीअली रिलीज कधी होणार हे जाहिर झालं आहे… २०२६ आणि २०२७ मध्ये दिवाळीत रामायण चित्रपट देशभरात रिलीज होणार आहे…(Latest Bollywood News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi