Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं प्रभू श्रीराम का?
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाची चर्चा अनाऊसमेंटपासून सुरुच आहे… तगडी स्टारकास्ट आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपट असल्यामुळे प्रेक्ष आतुरतेने या भव्य पौराणिक चित्रपटाची वाट पाहात आहेत… खरं तर आधी रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या रामायण चित्रपटाचं बजेट ८३५ कोटी असल्याचं सांगण्यात आलं होतं… मात्र आता हे बजेट थेट १००० कोटींच्या पुढे गेलं असून एस.एस राजामौली यांच्या SSMB29 चित्रपटाच्या १००० कोटींच्या बजेटलाही मागे टाकलं आहे… दरम्यान, या चित्रपटात रणबीर कपूर यानेच प्रभू श्रीराम का साकारले आहेत याचं कारण आता समोर आलं आहे…तसेच, कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं आहे यावरही एक नजर टाकूयात…(Ranbir Kapoor)

तर, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट प्रत्येक भारतीयांसाठी एक जिव्हाळ्याचा आणि आस्थेचा विषय आहे… ५००० वर्षांपूर्वीचा इतिहास आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून एक वेगळी पर्वणी प्रेक्षकांना दिली जाणार आहे… तसेच, या चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका रणबीर कपूर साकारणार यामुळे काही जणं आनंदी आहेत तर काहींना हे पटलं नाही आहे… १६०० कोटींचं बजेट असणाऱ्या रामायण चित्रपटात रणबीरची निवड करण्याचं कारण सांगत कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्रा म्हणाले की,”रणबीरच्या चेहऱ्यावर एक निरागसता, शांतता आहे. त्याच्या आतलं मूल दिसून येतं. प्रभू श्रीरामांसारख्या दिव्य, सर्वमान्य व्यक्तिमत्त्वासाठी हे गुण अत्यंत आवश्यक होते. रणबीर फार रिअल अॅक्टिंग करतो आणि तुम्ही त्याला अभिनयात हरवू शकत नाही. त्याला चित्रपट हिट किंवा फ्लॉप होईल याची अजिबात काळजी नसते. तो आपल्या विश्वातच रममाण होऊन फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करत असतो”. त्यामुळे रणबीरची प्रभू राम यांच्या भूमिकेसाठीची निवड का केली हे तुर्तास स्पष्ट झालं आहे…

दरम्यान, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट असणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटसाठीच जवळपास ११ कोटी खर्च केल्याचं सांगितलं जात आहे… याशिवाय, Siasat.com यांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीर कपूर याला ‘रामायण’ चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन देण्यात आलं आहे… दोन भागांमध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रत्येक भागासाठी रणबीरला ७५ कोटी प्रत्येकी भाग देण्यात आले आहेत…त्यानुसार १५० कोटी मानधन रणबीरला दिलं गेल आहे..
================================
हे देखील वाचा: Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित आहेत का?
=================================
तर, सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवी (Sai Pallavi) हिला एकूण १२ कोटी, रावणाची भूमिका साकारणाऱ्या यश याला एकूण १०० कोटी, हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलला एकूण ४० कोटी देण्यात आले आहेत… त्यामुळे नक्कीच भारतीय चित्रपटसृष्टीतील भव्य पौराणिक चित्रपट ‘रामायण’ हा नवा इतिहास नक्कीच रचू शकेल अशा आशा व्यक्त केल्या जात आहेत… २०२६ आणि २०२७ च्या दिवाळीत रामायण चित्रपटाचे दोन भाग रिलीज होणार आहेत…9Ramayana Movie budget)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi