
“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत… ४ हजार कोटींचं बजेट असणारा बॉलिवूडमधला हा पहिला बिग बजेट चित्रपट असणार आहे… या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम तर साई पल्लवी सीता माता यांच्या भूमिका साकारणार आहेत… तसेच, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिस्णार असून त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दल फार महत्वाचं विधान केलं आहे…(Ramayana Movie News)
सनी देओल यांनी टाइम्स नाऊशी बोलताना म्हटलं की, “मला वाटतं हा रामायण हा चित्रपट खूप चांगला होणार आहे. रणबीर एक खूप चांगला कलाकार आहे. तो कोणताही प्रोजेक्ट हातात घेतो तेव्हा ती भूमिका अक्षरश: जगतो. चित्रपटातील भूमिकेवरुन दबावाबद्दल सांगायचं तर थोडं नर्व्हस तर वाटतंच. पण हीच याची सुंदरता आहे. तुम्ही या आव्हानाचा सामना कसा कराल हा विचार करायला लागता. तसंच या भूमिकेमध्ये कसे खरे उतराल याची विचार येतो. आमचे दिग्दर्शक, निर्मात्यांनी यावर खूप अभ्यास केला आहे. ते जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ते हॉलिवूडपेक्षा कमी नसणार याची मला खात्री आहे.”

पुढे सनी म्हणाले की,”रामायण असं किती वेळा बनलं आहे आणि किती रामलीला होतात? जेव्हा गोष्टी मोठ्या पडद्यावर येतात तेव्हा सर्वच कलाकार ज्या पद्धतीने परफॉर्म करत आहेत मला खात्री आहे ही प्रत्येक जण आपल्या भूमिकेला न्याय देईल. लोकं संतुष्ट होतील आणि संपूर्ण चित्रपटाचा आनंद घेतील.”
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : ५ इंडस्ट्रीचे ५ दिग्गज एकत्र… ‘कुली’ १००० कोटी कमावणार?
=================================
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘रामायण’चा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत रिलीज होणार आहे. तर, दुसरा भाग २०२७ मध्ये येणार आहे. नमित मल्होत्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाचं हाय बजेट, आंतरराष्ट्रीय व्हीएफएक्स, अॅक्शन आणि म्युझिक टीम यामुळे नक्कीच हा भव्य पौराणिक चित्रपट होणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi