राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Ramayana Movie : ‘हे’ मराठी कलाकार झळकणार…९०० कोटींच्या ‘रामायणा’त!
प्रभू श्री राम आणि ‘रामायण’ (Ramayana) हा प्रत्येक हिंदु धर्मिय व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय… आजवर रामायणावर आधारित मालिका, नाटक, चित्रपट आले… प्रत्येक कलाकृतीने आपलं वेगळेपण सिद्ध करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला… परंतु, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ (Aadipurush) हा चित्रपट चांगलाच आपटला… खरं तर ६०० कोटींच्या बजेटमध्ये उत्कृष्ट ग्राफिक्स आणि व्हिएफएक्सचा अनुभव प्रेक्षकांना देता आला असता पण Larger Than Life काहीतरी करण्याचा नादात ‘रामायण’चं फिसकटवलं… (Entertainment News)

मात्र, आता जवळपास ९०० कोटींचं बिग बजेट असलेला ‘रामायण’ लवकरच प्रदर्शित होणार असून २००० कोटींच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनसह प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद जगभरातून मिळवणारे नितेश तिवारी (Nitesh Tiwari) प्रेक्षकांना ‘रामायण’ चित्रपटातून एक वेगळीच अनुभूती आणि प्रत्यक्ष रामायणाच्या जगात घेऊन जाणार आहेत… नुकताच ‘रामायण’ चित्रपटाचा अधिकृत लोगो रिव्हील करण्यात आला… या चित्रपटाच्या पहिल्या Glimpse मधूनच संपूर्ण चित्रपटाचा दर्जा काय असणार आहे याचा अंदाज एव्हाना आला असेलच… शिवाय आनंदाची बाब म्हणजे ९०० कोटींच्या या चित्रपटात ३ मराठी कलाकार ‘रामायण’ चित्रपटाचा भाग असणार आहेत… जाणून घेऊयात त्याबद्दल…(Ramayana Movie Cast)

रामानंद सागर यांनी १९८६ मध्ये ‘रामायण’ ही जवळपास ८० भागांची मालिका प्रदर्शित केली होती… त्या कलाकृतीनंतर असंख्य सीरीज किंवा चित्रपट आले, अगदी विविध भाषांमध्येही रिलीज झाले पण या मालिकेचा रेकॉर्ड फारसा कुणी मोडू शकला नाही… खरं तर, हिंदी असो किंवा साऊथ अलिकडे मराठी कलाकार विविध भाषांमधील मोठ्या-मोठ्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारुन प्रमुख कलाकारांनाच तगडी फाईट देत आहेत.. उदाहरणार्थ अॅनिमल (Animal) चित्रपटात रणबीर जरी प्रमूख भूमिकेत होता असला तरी मार्केट अख्ख उपेंद्र लिमये (Upendra Limaye) यांनी खाऊन टाकलं होतं… तर, रामायणाकडे पुन्हा वळूयात.. काही वर्षांपूर्वी मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत यांनी आदिपुरुष हा एक प्रयत्न खरं तर करुन पाहिला होता… प्रभास होता प्रभू श्रीराम, क्रिती सेनॉन होती सीता माता, तर देवदत्त नागे होते हनुमान… या व्यतिरिक्त चित्रपटात शुर्पणखाची भूमिका केली होती तेजस्वीनी पंडित हिने आणि विभिषण होता सिद्धांत कर्णिक… मराठी कलाकारांनी रामायणातील प्रमुख पात्र जरी साकारली असली तर सर्वांगाने आदिपुरुष अयशस्वी ठरला होता…

आता मात्र, नितेश तिवारी यांनी ‘रामायण’ चित्रपट हाती घेत नवा इतिहास रचण्याची तयारी सुरु केली आहे.. त्यांनी या चित्रपटात मराठी कलाकारांना संधी देत महत्वपूर्ण भूमिका देखील दिल्या आहेत… ‘रामायण’ चित्रपटात राजा भरत ही भूमिका आदिनाथ कोठारे (Aadinath Kotahre) साकारणार आहे तर अजिंक्य देव (Ajinkya Deo) देखीाल एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत… ’83‘ चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये आदिनाथ कोठारेला मिळालेला हा सर्वात मोठा ब्रेक आहे असं नक्कीच म्हणावं लागेल… दरम्यान,हे दोन मराठी कलाकार कॅमेऱ्यासमोर आपल्या अभिनयाची ताकद दाखवणार आहेत; तर कॅमेऱ्याच्या लेन्समधून सिनेमेटॉग्राफर महेश लिमये (Mahesh Limaye) प्रेक्षकांना अद्भूत जग दाखवणार आहेत… ‘यलो’ (Yellow Marathi movie) चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे महेश लिमये यांनी आजवर ‘हिरामंडी’, ‘बाजीराव मस्तानी‘,’दबंग ३’ अशा अनेक हिंदी सीरीज आणि चित्रपटांसाठी सिनेमेटॉग्राफी केली आहे… आणि आता बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या पौराणिक चित्रपटाचा ते भाग बनले आहेत…(Bollywood News)
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological चित्रपट!
=================================
दरम्यान, नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटातील मल्टि स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर, प्रभू श्री राम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीता माता साई पल्लवी, लक्ष्मण रवी दुबे, रावण यश, हनुमान सनी देओल, शूर्पणखा रकूलप्रीत सिंग, मंदोदरी काजल अग्रवाल,राजा दशरथ अरुण गोविल, कैकयी लारा दत्ता अशी नावं सध्या तरी समोर आली आहेत… हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या दिग्गज कलाकारांमध्ये मराठीतील ३ कलाकार आपलं अढळ स्थान निर्माण करणार आहेत ही खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी फार अभिमानाची बाब आहे… त्यामुळे आता ९०० कोटींच्या ‘रामायणम्’ (Ramayana Movie Multi Starcast) चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi