Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological चित्रपट!
सध्या बॉलिवूडमधला एक आगामी पौराणिक चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ (Ramayan) चित्रपट! रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांच्याशिवाय या चित्रपटात अन्य भूमिकेत कोणकोणते कलाकार झळकणार याची माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात…(Ramayana Movie 2026)

बॉलिवूडच्या Multi star cast trend मध्ये ‘रामायण’ चित्रपट Include झाला आहे. महत्वाचं म्हणजे, या चित्रपटात साऊथ आणि बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर- प्रभू श्रीराम, साई पल्लवी- सीता माता, यश- रावण, रवी दुबे- लक्ष्मण, सनी देओल- हनुमान, मोहित रैना- भगवान शिव, विवेक ओबेरॉय- विद्युतजिव्हा, आदिनाथ कोठारे- भरत, अरुण गोविल- राजा दशरथ, कुणाल कपूर- इंद्रदेव, रकुल प्रीत सिंग- शूर्पणखा, काजल अग्रवाल- मंदोदरी, लारा दत्ता- माता कैकयी!
बरं ही भलीमोठी स्टारकास्ट इथेच संपत नाही. Bollywood shadi’s यांनी दिलेल्या बातमीनुसार, चित्रपटात अनिल कपूर- राजा जनक, अमिताभ बच्चन- जटायू तर, विक्रांत मेस्सी- मेघनाद यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. महत्वाचं म्हणजे सगळ्या सुपरस्टार्ससोबत आदिनाथ कोठारे हे मराठी नाव देखील आहे… आदिनाथ या चित्रपटात राजा भरत ही भूमिका साकारणार आहे.. 83 चित्रपटानंतर ‘रामायण’ हा चित्रपट आदिनाथ कोठारेच्या (Aadinath Kotahre) करिअरमधील टर्निंग पॉईंट नक्की ठरेल यात शंका नाही. Multi Star Cast बरोबरच ‘रामायण’ हा हिंदीतील पहिला Biggest Budget चित्रपट असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘रामायण’चं एकूण बजेट ८३५ कोटी असून हा All time big budget चित्रपट चक्क दोन Parts मध्ये Release होणार आहे. (Ramayana Movie star cast)

खरं तर पौराणिक चित्रपटातील कोणतीही भूमिका साकारताना कलाकारांना कोणताच refrence नसल्यामुळे जे रामायण वाचलं आहे.. किंवा इतर कलाकारांनी ज्या भूमिका साकारल्या आहेत त्या पाहून भूमिका glorify करावी लागते.. त्यामुळे १० -१२पेक्षा अधिक कलाकार असणाऱ्या रामायण या चित्रपटात प्रत्येकाला आपल्या अभिनयाचा जोर लावावा लागणार आहे… याव्यतिरिक्त साऊथ फिल्म इंडस्ट्री गाजवणारी साई पल्लवी ‘रामायण’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे… तसंच रणबीर कपूर, साई पल्लवी, लारा दत्ता यांच्यासह बऱ्याच कलाकारांचा हा पहिलाच mythological चित्रपट असल्यामुळे त्यांना या वेगळ्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहेच.. (Mythological Movies in Bollywood)

यापूर्वीही ‘रामायणा’वर आधारित अनेक कलाकृती आल्या आहेत. ‘संपूर्ण रामायण’ (Sampoorna Ramayana) हा चित्रपट जितका गाजला तितकीच, ‘रामानंद दयासागर’ यांची ‘रामायण’ ही लोकप्रिय मालिकाही गाजली. इतकचं नव्हे, तर आतापर्यंत प्रभू श्रीराम यांची भूमिका जरी अनेक अभिनेत्यांनी साकारली असली तरी अरुण गोविल, गुर्मीत चौधरी, जितेंद्र आणि प्रभास यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहेत. त्यामुळे, आता चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम कसे साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. (Ramayana Movies and Web Series)
================================
हे देखील वाचा: Marathi Films 2025 : बॉलिवूडच्या प्रोडक्शन हाऊसला मराठी चित्रपटांची ओढ!
=================================
‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत Release होणार असून, २०२७ मध्ये दुसरा भाग Release होणार आहे. Big Budget ‘रामायण’ चित्रपट Box Office वर १००० कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाजही आत्तापासूनच बांधण्यात येतोय.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi