Ashi Hi Banwa Banwi :चित्रपटातील लीलाबाई काळभोर यांचा बंगला नेमका

एकुलत्या एका मुलाच्या लग्नपत्रिकेवर Ramesh Bhatkar यांचं नाव का नव्हतं?
मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांनी १९७७ साली आपल्या अभिनयाचा प्रवास सुरु केला होता… ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ या चित्रपटापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास ३० वर्ष अविरतपणे सुरु होता… चित्रपट मालिका, नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या रमेश भाटकर यांचं २०१९ मध्ये कॅन्सरने निधन झालं. रमेश भाटकर यांच्यावर काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप लागले. त्यामुळेच त्यांच्या मुलाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा लेकाच्या लग्नपत्रिकेवर रमेश यांचं नाव छापलं गेलं नव्हतं. काय घडलं होतं नेमकं जाणून घेऊयात…

तर, काही वर्षांपूर्वी १७ वर्षांच्या एका अभिनेत्रीने रमेश भाटकर यांच्यावर बलात्काराचे आरोप लावले होते. त्यामुळे रमेश भाटकरांसोबोच त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. रमेश यांच्या पत्नी मृदुला या हायकोर्टाच्या न्यायाधीश होत्या असल्यामुळे पतीवर असा आरोप झाल्यावर त्यांना साहजिक ते पचणं फार अवघड होतं… त्याचवेळी रमेश यांचा एकुलता एक मुलगा हर्षवर्धन याचं लग्न होतं. पण भाटकर कुटुंबाने हे प्रकरण शांतपणे हाताळण्याचा निर्णय घेतला. आरपारला दिलेल्या मुलाखतीत मृदुला यांनी मुलाच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता.
मृदुला म्हणाल्या की, “तेव्हा रमेशचं रिव्हिजन होतं. जिल्हा न्यायालयाने रमेशला निर्दोष सोडलं होतं. पण रमेशचं रिव्हिजनच सरकारने टाकलं. मला ते कळलंच नव्हतं की सरकारने असं का केलं? आता सरकारने रिव्हिजन टाकल्यावर कायदेशीररित्या आम्हाला लढणं भाग होतं. रमेश त्यावेळेस आरोपी नव्हता पण सरकारविरुद्ध रमेश भाटकर अशी ती केस होती. म्हणजे तेव्हा रमेश आरोपी नसल्यामुळे तेव्हा तो सुटला होता.”

पुढे त्या म्हणाल्या,”जेव्हा उच्च न्यायालयाच्या समोर ती जर केस असेल तर मला प्रश्न पडला की, हर्षवर्धनचं आणि सुप्रियाचं लग्न आहे. तर मला प्रश्न पडला की, आपण यांना आमंत्रण देतोय म्हणजे रमेश आणि मृदुला पत्रिकेवरती कसं लिहिणार? कारण ते शेवटी पार्टीकडून आमंत्रण दिलं गेलं, असं असेल. मग या गोष्टीवरती हर्ष आणि सुप्रियानेच तोडगा काढला. आम्ही असं ठरवलं की, त्या दोघांच्या वतीनेच आमंत्रण द्यायचं. त्यानंतर एका साध्या कागदावरती आम्ही ‘प्लीज कम फॉर अवर वेडिंग’ असं लिहिलं, आणि त्या दोघांनीच त्यांच्या लग्नाची पत्रिका त्यांच्याच नावाने छापली.” मृदुला शेवटी म्हणाल्या की, “म्हणजे लग्नात इतकी पथ्य पाळली की, रमेशबरोबर कोणत्याही न्यायमूर्तींचा फोटोपण नाही. एका बाजूला सगळे कलाकार मंडळी आणि रमेश आणि दुसऱ्या बाजूला सर्व जजेस असं ते केलं होतं.”
================================
हे देखील वाचा: Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!
=================================
दरम्यान, रमेश भाटकर यांनी ‘अष्टविनायक’, ‘आई पाहिजे’, ‘साहेब’, ‘मालिक एक’, ‘उमंग’, ‘भरत आला परत’, ‘घरंदाज’, ‘दे ताळी’, ‘हमाल दे धमाल’, ‘रंगत संगत’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या… याशिवाय, ‘दामिनी’, ‘खोज’, ‘बंदिनी’, ‘युगंधरा’, अशा बऱ्याच मालिकांमध्येही त्यांनी कामं केली होती…