Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Rana Naidu Season 2 Release Date: ‘राणा नायडू सीझन 2’ ची ओटीटी रिलीज डेट जाहीर; पाहा वेब सिरीज कुठे आणि केव्हा पाहता येईल?
Netflix वरील गाजलेली वेब सिरीज ‘राणा नायडू’ लवकरच आपल्या दुसऱ्या सिजनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच्या दुसऱ्या पर्वाची अधिकृत घोषणा झाली असून, आता त्याची रिलीज डेट ही समोर आली आहे. या घोषणेमुळे सिरीजच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं नवीन भरतं पडलं आहे. मंगळवारी नेटफ्लिक्स इंडिया ने ‘राणा नायडू 2’ चा नवीन पोस्टर जाहीर केला असून, त्यासोबतच प्रदर्शित होण्याचा दिवसही ठरवण्यात आला आहे. राणा दग्गुबाती आणि वेंकटेश दग्गुबाती यांची प्रमुख भूमिका असलेली ही थरारक कथा 13 जून 2025 रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.(Rana Naidu Season 2 Release Date)

दुसऱ्या सिजनमध्ये राणाची कथा अधिक गुढ होत जाईल . कुटुंब, सत्तेचा संघर्ष आणि त्याच्या अंतर्गत गुंतागुंतीच्या भावनांचा स्फोटक संग्राम पाहायला मिळेल. 2023 मध्ये ही सिरीज नेटफ्लिक्सवर सर्वाधिक यशस्वी ठरली होती, आणि आता ती आणखी वेगवान, भावनांनी भरलेली आणि चकित करणाऱ्या ट्विस्ट्ससह परतत आहे.

ही सिरीज सुंदर आरोन आणि लोकोमोटिव ग्लोबल यांच्या निर्मितीत साकारली आहे. करण अंशुमान यांनी याचे संकल्पनाकार असून, करण अंशुमान, सुपर्ण एस. वर्मा आणि अभय चोप्रा यांनी दिग्दर्शन केले आहे. यावेळी एका खास भूमिकेत अर्जुन रामपाल देखील प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्याच्यासह या पर्वात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. राणा दग्गुबाती, वेंकटेश दग्गुबाती, अर्जुन रामपाल, सुरवीन चावला, कृति खरबंदा, सुशांत सिंह, अभिषेक बनर्जी आणि डिनो मोरिया यांसारखे जबरदस्त कलाकार या वेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणार आहेत.(Rana Naidu Season 2 Release Date)
=================================
==================================
रिलीजची तारीख समोर आल्यापासून प्रेक्षक आता ‘राणा नायडू’ दुसऱ्या सिजनसाठी खूपच आतुर आहेत.आणि आता या थरारक मालिकेच्या प्रतीक्षेतली उत्सुकता आणखी वाढली आहे. याच्या पहिल्या सिजनचा प्रीमियर 10 मार्च 2023 रोजी झाला होता, ज्यामध्ये सुचित्रा पिल्लई, गौरव चोप्रा आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत झळकले होते. या शोला प्रेक्षकांनी त्यातील अभिनय आणि मनाला भुरळ घालणारी कथा यासाठी खूप पसंती दिली होती.