‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला टक्कर देणार Ranbeer-Alia च आलिशान घर; किंमत आहे थक्क करणारी !
Bollywood मध्ये जेव्हा लक्झरी आणि आलिशान घरे यांचा विषय निघतो, तेव्हा शाहरुख खानच्या (SRK) ‘मन्नत’चं नाव नेहमीच सगळ्याच वर घेतलं जातं. सुमारे २०० कोटी रुपये किंमत असलेल्या ‘मन्नत’ची ओळख म्हणजे बँडस्टँड, बांद्रा येथील समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं एक भव्य ६ मजली बंगला. यात जिम, प्रायव्हेट थिएटर, स्विमिंग पूल, लायब्ररी आणि खास बार अशा सर्व लक्झरी सोयी उपलब्ध आहेत. हे घर शाहरुखनं २००१ मध्ये १३.३२ कोटींना खरेदी केलं होतं. त्याचे इंटीरियर गौरी खान हिने स्वतः डिझाईन केलं असून हे घर आता पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. (Ranbeer-Alia’s New Home)

मात्र आता या यादीत आणखी एक स्टार जोडपं प्रवेश करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांच्या नव्या घराने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नव्या घराची किंमत तब्बल २५० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे हे घर त्यांनी आपल्या मुलीच्या नावावर म्हणजेच राहा कपूरया नावाने रजिस्टर केलं आहे. पाली हिल सारख्या मुंबईतील सर्वात पॉश भागात हे घर वसलेलं असून, या परिसरातील प्रत्येक स्क्वेअर फूटची किंमत अवाक करणारी आहे.

‘राहा हाऊस’ हे घर रणबीरच्या आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावरून ओळखलं जातं. हे घर कपूर कुटुंबाच्या वारशाचा भाग असून, याआधी येथे राज कपूर आणि कृष्णा राज कपूर राहत होते. रणबीर, आलिया आणि रणबीरची आई नीतू कपूर या तिघांनी मिळून घराच्या संकल्पनेपासून ते उभारणीपर्यंतचा प्रत्येक टप्पा स्वतः लक्षात घेतला आहे. गेली अनेक वर्षं सुरु असलेला हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असून, लवकरच हे कुटुंब आपल्या नव्या घरात स्थलांतर करणार असल्याचं कळतं. (Ranbeer-Alia’s New Home)
===========================
हे देखील वाचा: ‘एक… दो… तीन’ ते मोहिनी पर्यंतचा प्रवास: Madhuri Dixit च्या स्टारडमचा खास किस्सा!
===========================
एका बाजूला आलिशान घरात शिफ्ट होण्याची तयारी सुरु आहे, तर दुसऱ्या बाजूला दोघेही त्यांच्या आगामी सिनेमांमध्ये व्यस्त आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘Love & War’ या सिनेमाची घोषणा नुकतीच झाली आहे, ज्यामध्ये रणबीर आणि आलिया मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र झळकणार आहेत. अभिनयाच्या आघाडीवर आणि वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी ठरलेलं हे जोडपं आता त्यांच्या नव्या घरामुळेही चर्चेत आहे.