Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Ranbir-Alia ने ‘राहा’ला गिफ्ट केलेल्या घराच्या नावाची खासियत आहे तरी काय?
बॉलिवूड इंडस्ट्रीतलं बबली कपल म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt). लहानपणापासूनच रणबीरसोबत संसार थाटण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आलियाने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांना राहाच्या (Raha Ranbir Kapoor) रुपात गोंडस कन्यारत्न प्राप्त झालं. आता पालक म्हणून राहाची सगळी स्वप्न पुर्ण करु पाहणाऱ्या आलिया-रणबीरने त्यांचं नवं आलिशान घर बांधलं आहे. राहा हिच्यासाठी त्यांचं हे गिफ्ट असून मुंबईतील अतिशय महागड्या जागी त्यांनी हा लक्झरी बंगला बांधला आहे. पाहूयात बंगल्याची झलक आणि किंमतही…(Bollywood news)

रणबीर आणि आलिया लेक राहाला घेऊन नव्या घरी जाण्यासाठी फारच आतुर आहेत. त्यांनी आपल्या आलिशान बंगल्याची सजावट स्वत: केली असून घराच्या नावाचंही फार महत्व आहे. रणबीर-आलियाने त्यांच्या बंगल्याचं नाव ‘कृष्णा राज’ (Krishna Raj) असं ठेवलं असून रणबीरच्या दिवंगत आजी कृष्णा राज कपूर (Raj Kapoor) यांच्या नावावरुन हे नाव ठेवलं आहे. चार मजल्याच्या या लक्झरी बंगल्यात प्रत्येक फ्लोअरवर हिरवळ दिसत असून ‘राहा’साठी खास गार्ड्न एरिया देखील तयार कऱण्यात आला आहे. (Entertainment Tadaka)

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलियाच्या या ड्रीम घराची किंमत २५० कोटी रुपये इतकी आहे. आधी ही प्रॉपर्टी आधी राज कपूर (Raj Kapoor) आणि कृष्णा राज कपूर (Krishna Raj Kapoor) यांची होती. त्यानंतर १९८० च्या दशकात त्यांनी ती ऋषी कपूर आणि नीतू यांना दिली होती. आता ती वारसा हक्काने रणबीर कपूर याच्याकडे आली असून त्या जागेवर रणबीरने बंगला उभारला असून तो हे घर लेक राहा कपूरच्या नावावर करणार आहे. लवकरच रणबीर-आलिया-राहा या नव्या ‘कृष्णा राज’ या घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Ranbir-Alia Dream Home)
================================
हे देखील वाचा: आलियाचा, गंगूबाई काठियावाडी…
=================================
दरम्यान, लवकरच रणबीर कपूर नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेच्या भूमिकेत दिसणार असून तिचा हा बॉलिवूड डेब्यू असणार आहे. तर दुसरीकडे आलिया भट्ट यशराज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिवर्स’मध्ये पदार्पण करणार असून तिचा ‘अल्फा’ (Alpha Movie) हा चित्रपटही लवकरच येणार आहे. आलियासोबत या स्पाय चित्रपटात शर्वरी वाघ (Sharvari Wagh) देखील झळकणार आहे. (Ranbir Kapoor And Alia Bhatt Movies)