‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
रंग माझा वेगळा
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेचे शीर्षकगीत खूप लोकप्रिय झाले असून या गाण्याच्या लोकप्रियतेने शिखर गाठले आहे. शीर्षकगीतांच्या दुनियेत प्रचंड लोकप्रियता मिळवणारा सर्वांचा लाडका संगीतकार निलेश मोहरीर यानेच ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या शीर्षकगीताला संगीत दिले आहे. या गाण्याबद्दल निलेश म्हणतो, “स्टार प्रवाह वाहिनीसाठी मी अनेक शीर्षकगीते केली आहेत. अतुल केतकर, मोनिका रणदिवे, स्टार प्रवाहची संपूर्ण टीम आणि अर्थातच सतीश राजवाडे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो मला महत्वाचा वाटतो. मालिकेची स्टोरी लाईन मला ऐकवण्यात आली होती.
शीर्षकगीत करताना ते एक प्रेमगीत असावं आणि ते सकारात्मक असावं, असा विचार करूनच संगीत द्यायचे होते. श्रीपाद जोशी याने ते गीत लिहिले आहे. रंग कोणताही असो, तो चांगलाच असतो, असा सकारात्मक विचार चाल देताना मांडणे आवश्यक होते. हे गीत पूर्ण शुद्ध स्वरात बांधलेलं आहे. लिल्टिंग मेलडीज म्हणजे सुखद उतार चढाव असलेल्या रचना अर्थात मधुर आरोह अवरोह असलेली रचना आणि तशी रचना करण्याचा एक संगीतकार या नात्याने मी प्रयत्न केला आहे. सतीश राजवाडे यांनाही ते खूप आवडलं. आनंदी जोशी आणि मंगेश बोरगावकर या दोघांनी सुद्धा या गीताला गायक या नात्याने शंभर टक्के न्याय दिला आहे.”
आनंदाची गोष्ट ही की निलेश मोहरीर याने त्याच्या यु ट्यूब चॅनलची सुरुवात या गाण्याचा लिरिकल व्हिडीओ पोस्ट करून केली होती . आजीवसन स्टुडिओत या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले होते. आज या विडिओने एक मिलियन व्ह्यूज चा टप्पा ओलांडला आहे. त्याचप्रमाणे हे शीर्षकगीत स्टार प्रवाह वाहिनीच्या यु ट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे. तिथे सुद्धा या गाण्याने अठरा लाख व्ह्यूजचा टप्प्पा ओलांडला आहे. गीतकार श्रीपाद जोशी म्हणाला, ” मी संगीतकार निलेश मोहरीर याच्याबरोबर करत असलेले हे गीत म्हणजे माझे तिसरे महत्वाचे प्रोजेक्ट होते. या आधी निलेश साठी मी साथ दे तू मला, जिवलगा या स्टार प्रवाह वरील मालिकांसाठी गीते लिहिली होती. आता ही आणखी एक महत्वाची संधी आली होती. ‘रंग माझा वेगळा’ ही एक सुरेश भटांच्या गीताची गाजलेली ओळ आहे आणि ते गीतही प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे पूर्ण वेगळ्या पद्धतीने रचना करून आणि मालिकेचे कथानक लक्षात घेऊन शब्द लिहायचे होते. त्यात प्रत्येक शब्दाला एक रंग असतो, ही गोष्ट पण मी गीतकार या नात्याने ध्यानात घेतली. प्रेमाचे रंग, नात्याचे रंग, हे सर्व मांडण्याचा प्रयत्न केला. ‘रंग माझा वेगळा’ या ओळीत एक जो अटीट्युड आहे, तो सुद्धा महत्वाचा आहे. या गाण्यात एक ओळ आहे. “हे तुझे असणे इथे ,अर्थ देते जीवना” या ओळीतील ‘अर्थ देते जीवना’ हे शब्द मी रेकॉर्डिंगच्या वेळी बदलून ‘हे तुझे असणे इथे रातराणीच्या खुणा’ असे केले आणि त्यामुळे त्या गाण्याचा रंग अधिकच चांगला झाला.”
रंग माझा वेगळा या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द आहेत,
आपुल्या नात्यातले रंग सारे रंगले
चिंब इतकी जाहले ,मी तुझ्यात दंगले
कडव्यामध्ये
‘रंग उजळे सांग का, सांजवेळी सावळा
संख्या माझ्यातून हा रंग माझा वेगळा’
हे शब्द तर मनात कायम लक्षात राहतात.