Preeti Zinta ने कार अपघातात गमावले होते पहिले प्रेम, अभिनेत्रीने

Bollywood : डोळ्यांमुळे हॉस्पिटलमध्ये हरवलेली हरवलेली ‘ही’ अभिनेत्री!
आपल्या आवडत्या कलाकाराचा कोणता चित्रपट येतोय हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असतेच पण त्याहूनही जास्त त्यांच्या वैयक्तिक जीवनात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला लोकांना अधिक आवडतं. बॉलिवूडचा एक काळ आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवणाऱ्या एका अभिनेत्रीचा मजेशीर किस्सा जाणून घेऊयात. ही अभिनेत्री ज्यावेळी जन्माला आली तेव्हा चक्क हॉस्पिटलमध्ये तिची दुसऱ्या नवजात बाळासोबत अदला बदली झाली होती. कोण होती ती अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात…(Bollywood)
तर ही अभिनेत्री म्हणजे कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, ब्लॅक अशा अनेक चित्रपटात दमदार अभिनय करणारी राणी मुखर्जी. एका मुलाखतीमध्ये राणी मुखर्जी हिने स्वतःच तिच्या जन्माचा किस्सा सांगितला होता. राणी मुखर्जी दिग्दर्शक-निर्माते राम मुखर्जी आणि कृष्णा मुखर्जी यांची मुलगी. तर झालं असं की राणी मुखर्जीची चुकून एका वेगळ्याच नवजात बाळाच्या रूममध्ये अदला बदली झाली होती. कृष्णा मुखर्जी यांनी बाळाला जवळ घेतलं तेव्हा त्या म्हणाल्या की, “ही माझी मुलगी नाही आहे तिचे डोळे ब्राऊन आहेत. जा माझ्या बाळाला शोधा”.

कृष्णा यांच्या सतर्कतेमुळे राणी गायब झाल्याचं समजलं आणि हॉस्पिटलमध्ये शोध सुरू झाला. आणि एका पंजाबी कुटुंबाच्या रुममध्ये राणी मुखर्जी सापडली. त्या पंजाबी कुटुंबात आठवी मुलगी जन्माला आली होती आणि तिथे राणी सापडली. त्यामुळे आजही राणीच्या घरचे तू खरं तर पंजाबी आहेस चुकून आमच्या कुटुंबात आली असं म्हणत तिची खिल्ली उडवत असतात.मात्र, आईच्या सावध आणि सतर्कपणामुळे राणी सापडली. (Bollywood update)
राणी मुखर्जी हिला तिच्या उंचीमुळे चिडवलं गेलं. काही कलाकार तिला देढ फुटिया बोलत होते. पण राणीने तिच्या ॲक्टिंग स्किल्सने सगळ्यांचीच तोंडं बंद केली. मेहंदी, बिच्चू, Black, साथीया, पहेली, मर्दानी, हिचकी, Mrs. Chatterjee in Norway अशा अनेक चित्रपटात तिने अप्रतिम अभिनय करत प्रेक्षकांची शाबासकी मिळवली. सध्या राणी चित्रपटसृष्टीपासून लांब असून एकेकाळी तिने तिला लग्नानंतर कायम गृहिणी बनण्याची इच्छा देखील व्यक्त करून दाखवली होती.