Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ranpati Shivray: Swari Agra Teaser: शौर्य, बुद्धी आणि धाडसाचा अद्वितीय संगम; पडद्यावर उलगडणार शिवइतिहासातील थरारक अध्याय !

 Ranpati Shivray: Swari Agra Teaser: शौर्य, बुद्धी आणि धाडसाचा अद्वितीय संगम; पडद्यावर उलगडणार शिवइतिहासातील थरारक अध्याय !
Ranpati Shivray: Swari Agra Marathi Movie
मिक्स मसाला

Ranpati Shivray: Swari Agra Teaser: शौर्य, बुद्धी आणि धाडसाचा अद्वितीय संगम; पडद्यावर उलगडणार शिवइतिहासातील थरारक अध्याय !

by Team KalakrutiMedia 16/12/2025

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर दूरदृष्टी असलेले अत्यंत कुशल रणनीतीकार होते. स्वराज्य उभारताना त्यांनी तलवारीइतकाच मेंदूचा वापर केला आणि त्यांची मुत्सद्देगिरी अनेक ऐतिहासिक प्रसंगांतून ठळकपणे दिसून येते. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज बांधणे आणि प्रसंगानुरूप योजना आखणे, हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. गनिमी काव्याची रणनिती ही महाराजांची ओळख बनली. शत्रूला नकळत गाठून त्याला धक्का देणे आणि कमी नुकसानात मोठे यश मिळवणे, या पद्धतीत महाराज निष्णात होते. त्या काळातील सर्वात बलाढ्य मानल्या जाणाऱ्या मुघल सत्तेलाही त्यांनी हादरवून सोडले. विशेषतः औरंगजेबाच्या दरबारात निर्भयपणे उभं राहणं आणि आग्रा स्वारीसारखा धाडसी निर्णय घेणं, हा स्वराज्याच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो.(Ranpati Shivray: Swari Agra Teaser)

Ranpati Shivray: Swari Agra Teaser
Ranpati Shivray: Swari Agra Movie

हा थरारक आणि प्रेरणादायी प्रसंग आता भव्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘रणपति शिवराय: स्वारी आग्रा’ (Ranpati Shivray: Swari Agra) हा चित्रपट शिवजयंतीच्या मुहूर्तावर, म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून, त्याचा टिझर नुकताच समोर आला आहे. या टिझरमधून मुघल सत्तेच्या कठोर पहाऱ्यातून महाराजांनी घेतलेली धाडसी झेप, दरबारातील तणावपूर्ण क्षण आणि राजांची असामान्य बुद्धिमत्ता यांची झलक पाहायला मिळते.

Ranpati Shivray: Swari Agra Movie

हा चित्रपट लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतील पुढचा टप्पा आहे. ऐतिहासिक घटनांना भव्यतेसह मांडण्याची त्यांची शैली याआधीही प्रेक्षकांनी अनुभवली आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांच्या संयुक्त निर्मितीत साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती अनुभवी टीमने केली आहे.(Ranpati Shivray: Swari Agra Teaser)

=============================

हे देखील वाचा: Bhau Kadam आणि Nilesh Sable पुन्हा एकत्र दिसणार?  झी मराठीच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण

=============================

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता स्वराज्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याची आणि बुद्धीचातुर्याची साक्ष देणारा हा इतिहासातील सोनेरी अध्याय, मोठ्या पडद्यावर जिवंत करण्याचा आनंद निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाचं वितरण पॅनोरमा स्टुडिओजकडून करण्यात येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: chhatrapati shivaji maharaj Digpal Lanjekar Entertainment Marathi Movie Ranpati Shivray Swari Agra maeargi movie Ranpati Shivray Swari Agra Teaser
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.