Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

DeepVeer : एअरपोर्टवर काळ्या कपड्यांमध्ये रणवीर-दीपिका झाले स्पॉट
बॉलिवूड सेलिब्रिटींचे एअरपोर्ट लूक कायमच चर्चेत असतात. त्यातच अभिनेता रणवीर सिंह Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हे पापाराझींचं आवडतं सेलिब्रिटी कपल आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. दुआच्या जन्मानंतर नुकतेच रणवीर आणि दीपिका एअरपोर्टवर नेहमीप्रमाणेच त्यांच्या हटके एअरपोर्ट लूकमध्ये दिसले. दीपिकापेक्षा रणवीरचा फॅशन सेन्स आणि त्याचे आऊटफिट अधिक व्हायर होताना दिसतात. रणवीर कायमच वेगवेगळे फॅशन लूक करुन त्याच्या चाहत्यांना थक्क करत असतो. पण आता एअरपोर्टवर दोघांनी संपूर्ण काळे कपडे घातल्यामुळे त्यांचा (DeepVeer) हा लूक सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. (Bollywood fashion news)

खरं तर सोशल मिडियाच्या अधिक वापरामुळे कलाकारांना प्रायव्हसी राहिली नाही असं कलाकार स्वत:च तक्रार करताना दिसतात. पण तरीही काही सेलिब्रिटी पापाराझींना बोलावून शो ऑफ देखील करतात हे ही तितकंच सत्य आहे. पण काही सेलिब्रिटींना स्पॉट करण्यासाठी पापाराझी स्वत:हून आतुर असतात त्यापैकीच एक म्हणजे दीपवीर (DeepVeer). बऱ्याचवेळा रणवीर आणि दीपिका एअरपोर्टवर twinning करताना दिसतात. तर दीपिकाचं एअरपोर्ट लूक हे अनेक मुलींसाठी style icon आहे. (Bollywood masala)
===========================
हे देखील वाचा: Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!
===========================
सोशल मिडीयावर viral bhayani ने दीपिका पादुकोण व रणवीर सिंह (Bollywood couple) यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीर आणि दीपिकाने संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचं दिसतं. दीपिकाने काळ्या रंगाचा फुल शर्ट-काळ्या रंगाची पँट, काळे बूट बूट घातले आहेत. तर रणवीरने काळ्या रंगाचं लांब जॅकेट, डोक्यावर काळी टोपीही घातली आहे. त्यांच्या या लूकवर नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, “ते कोणाला तरी किंवा बँकेला लुटण्यासाठी जात आहेत, असा लूक का केला आहे?”,तर दुसऱ्या एक नेटकरी लिहितो, “कदाचित आज मुंबईत बर्फ पडलाय”. तर, “इतक्या उष्ण वातावरणात असे कपडे कसे घालू शकतात?” असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. (Entertainment update)

रणवीर-दीपिकाने (DeepVeer) इंडस्ट्री बाहेरील असूनही खरं तर आपल्या टेलेंन्टवर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे. २००६ साली दीपिकाने कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ मधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ‘ओम शांती ओम’मध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) सोबत स्क्रिन शेअर करुन बॉलिवूडमध्ये केलेली दमदार एन्ट्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर, रणवीर सिंग याने २०१० मध्ये ‘बॅण्ड बाजा बारात’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि आपल्या अभिनयासोबतच हटके ड्रेसिंग स्टाईलने लोकांची मनं जिंकली.
‘राम-लीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव-मस्तानी’, ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात रणवीर आणि दीपिकाने एकत्र काम केलं. आता पुन्हा एकदा ही जोडी कोणत्या चित्रपटातून एकत्र दिसणार याकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, फरहान अख्तरच्या Don 3 मध्ये रणवीर सिंग दिसणार असून दीपिका ‘कल्की २’ मध्ये दिसणार आहे.