
Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा एनर्जेटीक धमाका!
कधी चॉकलेट बॉय तर कधी ‘गल्ली बॉय’ बनून आपल्या एनर्जीने चित्रपटाचा सेट आणि सहकलाकार यांनाही भंडावून सोडणारा सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणजे रणवीर सिंग (Ranveer Singh)… फिल्मी इंडस्ट्रीत आऊटसाईडर असलेल्या रणवीरने २०१० मध्ये पहिला ‘बॅंड बाजा बारात’ (Band Baaja Baarat) चित्रपट केला आणि सगळ्याच कलाकारांचा बॅंड वाजवला… पुढे एकामागून एक विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची एक एक पदर उलगडत त्याने मेकर्सना आणि त्याच्या चाहत्यांना थक्क करुन सोडलं… मग तो ‘लेडिज वर्सेस रिकी बेहेल’ मधला प्लेबॉय असूदेत किंवा मग ‘दिल धडकने दो’ मधला सगळ्यांनाच रिलेट करता येणारा प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) लहान भाऊ असूदेत… रणवीरने दर वर्षी १ किंवा १-२ वर्षांनी १ चित्रपट केला पण तो ढासूच असेल याची खबरदारी मात्र नक्कीच घेतली… आणि यात ताजं उदाहरण म्हणजे आदित्य धर दिग्दर्शक ‘धुरंधर’ (Dhurandhar).… भारतीय सैन्यातील शहीद मेजर मोहित शर्मा यांची भूमिका तो या चित्रपटात साकारतोय असं रिपोर्ट्सनुसार सांगितलं तरी जातंय… चला तर जाणून घेऊयात लेखक ते अभिनेता असा प्रवास रणवीर सिंगचा नेमका घडला तरी कसा? (Entertainment News)

बॉलिवूडमधला अतरंगी आणि द मोस्ट एनर्जेटिक कलाकार अशी रणवीर सिंगची ओळख आहे… अभिनयासोबतच डान्स आणि हटके फॅशनमुळे रणवीर कायम चर्चेत असतोच… पण तुम्हाला माहित आहे का रणवीर सिंग जितका चांगला अभिनेता आहे तितकाच चांगला तो एक लेखक देखील आहे… हो बरोबर वाचलंत तुम्ही… अमेरिकेतली इंडियाना युनिवर्सिटीमध्ये रणवीरने क्रिएटिव्ह राईटिंग आणि थिएटरमध्ये डिग्री घेतली आहे… तसेच, J Walter Thompson and O&M या अॅड एजन्सीजमध्ये रणवीरने कॉपी राईटर म्हणून काम देखील केलं आहे.. आणि त्यानंतर २०१० मध्ये तो अभिनयाकडे वळला तो कायमचाच; पण तरीही भविष्यात रणवीरला आपली लिखाणाची आवड जपण्यासोबतच त्याला दिग्दर्शनही करायचं आहे… त्यामुळे अभिनयासोबतच बायको दीपिका पादूकोण (Deepika Padukone) निर्मिती क्षेत्रात उतरली असताना आणि भविष्यात रणवीरनेच एखादा चित्रपट लिहून तो डिरेक्ट केला आणि दीपिकाने तो प्रोड्युस करत याच दोघांनी अभिनय देखील केला तर वावगं नक्कीच वाटायला नको… (Ranveer Singh Information)
================================
================================
रातोरात फेम मिळतं हे वाक्य बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत खरं ठरलं आणि त्याच यादीत येणारं नाव म्हणजे रणवीर सिंग… २०१० मध्ये आलेल्या बॅड बाजा बारात चित्रपटासाठी त्याला पहिलाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता… शिवाय, आऊटसाईड असल्यामुळे जर का या चंदेरी दुनियेत फिट व्हायचं असेल तर नाव, आडनाव बदलावं लागतं.. तसंच, रणवीरने त्याचं खरं आडनाव भवनानी असं बदलून फक्त रणवीर सिंग असं ठेवलं… रणवीरने १५ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये आत्तापर्यंत ‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘सिम्बा’, ‘पद्मावत’, ‘८३’ अशा उल्लेखनीय चित्रपटांमध्ये कामं केली… विशेष म्हणजे त्याच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका ही गाजली आणि बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरली…. (Ranveer Singh Movies)

२०२४ मध्ये ‘सिंघम अगेन’ चित्रपटात रणवीर दिसला होता.. त्यानंतर ‘धुरंधर’ चित्रपटासाठी तो स्वत:ला तयार करत होता… एखादं सत्य घटनेतील पात्र साकारण्यासाठी कलाकाराला केवळ अभिनयावरच नाही तर तसं दिसणं, वागणं, बोलणं, फिजीकली तसे स्वत:त बदल करणं या सगळ्यावर मेहनत घ्यावी लागते आणि ‘धुरंधर’चा ट्रेलर पाहिल्यानंतर रणवीरने ती मेहनत नक्कीच घेतली आहे हे त्याच्या लूकवरुनच स्पष्ट होतंय… या चित्रपटात रणवीर सिंग ज्या अशोक चक्र पुरस्कार विजेते शहीद मेजर मोहित शर्मा (Mohit Sharma) यांची भूमिका साकारणार आहेत ते पाकितृस्तानात इफ्तिखार भट्ट बनून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी गटात शिरले होते… स्पेशल मिशनवर असणारे मोहित शर्मा भारताविरुद्ध नाही तर भारतासाठी गनिमी काव्याने दहशवाद्यांशी लढत होते… भारतीय सैन्यातील या महान अंडरकव्हर एजंटचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर येणार असून त्यांचं संपूर्ण मिशन काय होतं आणि यात बाकी महत्वाची पात्र आणि घडलेल्या सत्य घटना काय होत्या? हे प्रेक्षकांना ५ डिसेंबर २०२५ रोजी समजणार आहे… आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना, अर्जून रामपाल, आर माधवन, संजय दत्त आणि सारा अर्जून असे कलाकार झळकणार आहेत… (Dhurandhar Movie Release)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi