राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’ खास दिवशी रिलीज होणार?
अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘धुरंधर’ (Dhurandhar movie) चित्रपटाची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे… इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत या चित्रपटाचा एक अॅक्शन सीन देखील शुट केला होता आणि त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल देखील झाले होते… आदित्य धर (Aaditya Dhar) दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रटाबद्दल आता एक महत्वाची अपडेट समोर आली असून चित्रपटाचा टीझर एका खास दिवशी रिलीज होणार असल्याची माहिती समोर येत आहे…(Bollywood upcoming movies)

मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंग याचा ‘धुरंधर’ चित्रपटाचा पहिला अधिकृत टीझर ६ जूलै २०२५ रोजी रिलीज होणार असं सांगितलं जात असून याच दिवशी रणवीर सिंग याचा वाढदिवस असतो.. त्यामुळे ६ जूलै रोजी रणवीरच्या चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर एक आगळीवेगळी भेट असेल असं नक्कीच म्हणावं लागेल…(Dhurandhar movie teaser)
================================
हे देखील वाचा: SSMB29 : राजामौलींच्या १००० कोटींचं बजेट चित्रपटाचा’बाहुबली’पेक्षाही भव्यसेट!
=================================
‘उरी’ चित्रपट फेम आदित्य धर आणि रणवीर सिंग धुरंधर चित्रपटानिमित्त पहिल्यांदाच एकत्रित काम करत असून या चित्रपटात यामी गौतम, आर माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जून रामपाल हे कलाकार दिसणार आहेत.. चित्रपटाचं जवळपास ७५ टक्के शुटींग पुर्ण झाल्याचं समोर आलं असून २०२६ मध्ये हा चित्रपट रिलीज होईल अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, धुरंधर सोबतच रणवीर आगामी ‘डॉन ३’ (Don 3 movie) चित्रपटातही झळकणार आहे.(Ranveer singh movies)