Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

VIROSH Wedding Photos : शुभमंगल सावधान! अखेर रश्मिकाचा ‘विजय’ झालाच

 VIROSH Wedding Photos : शुभमंगल सावधान! अखेर रश्मिकाचा ‘विजय’ झालाच
मिक्स मसाला

VIROSH Wedding Photos : शुभमंगल सावधान! अखेर रश्मिकाचा ‘विजय’ झालाच

by रसिका शिंदे-पॉल 26/02/2026

बऱ्याच दिवसांपासून ज्या दिवसाची लोकं वाट पाहात होते अखेर तो दिवस आला. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अर्थात आपल्या लाडक्या VIROSH यांनी लग्नगाठ बांधत नव्या जीवन प्रवासाची सुरुवात केली आहे. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी उदयपुरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केलं आहे. नुकतेच रश्मिका आणि विजय यांच्या सोशल मिडियावरुन लग्नाचे खास क्षण शेअर करत दोघांनी आपल्या पार्टनरसाठी खास कॅप्शन लिहिले आहेत. (Rashmika Mandanna & Vijay Devarkonda Marriage)

विजय देवरकोंडाने लग्नाचे अगदी गोड फोटो शेअर करत आपल्या बायकोसाठी लिहिलं आहे की, ” एके दिवशी, मला तिची आठवण येत होती. तिची आठवण इतकी येत होती की मला असं वाटलं की ती आज जर माझ्यासोबत असती तर दिवस किती चांगला गेला असता. जेवताना ती माझ्या समोर बसली असती तरी दोन घास जास्तच जातात. जर ती माझ्यासोबत व्यायाम करत असती तर ती शिक्षा वाटत नाही.जणू काही मला तिची गरज होती. म्हणूनच मी तिला माझी बायको बनवलं आहे”.. (Vijay Devarkonda post for Rashmika Mandanna)

तर, रश्मिकाने आपल्या नवऱ्यासाठी लिहिलंय, ” Hi my loves…”, तुम्हाला माझ्या नवऱ्याची ओळख करून देते. मिस्टर.विजय देवरकोंडा! ज्या माणसाने मला खरे प्रेम कसं असतं हे शिकवलं,ज्या माणसाने मला शांततेत राहणे कसं असते हे दाखवून दिलं. तो माणूस जो मला दररोज सांगायचा की मोठी स्वप्ने पाहा… आणि सतत सांगायचा की मी जे काही साध्य करू शकते त्यापेक्षा खूप जास्त साध्य करण्यास मी सक्षम आहे. ज्या माणसाने मला कधीच कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखलं नाही. तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम माणूस आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी या माणसावर एक पुस्तक लिहू शकते. मी ती स्त्री बनली आहे जे मी नेहमीच स्वप्न पाहिलं होतं. मी खरोखरच धन्य आहे. विज्जू, तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे नेहमीच शब्द कमी पडतील. मी तुला नेहमीच हेच सांगितलं आहे. पण आता खूप अर्थपूर्ण वाटतंय, कारण माझ्याकडे तू आहेस. माझं यश, अपयश, आनंद आणि दुख हे सगळं तू जवळून पाहिलं आहेस. त्या सगळ्याचा साक्षीदार तू आहेस”…(Rashmika Mandanna post for Vijay Devarkonda)

पुढे तिने असं देखील लिहिलं आहे की, ” तुझी आयुष्यभराची सोबती होण्यासाठी मी खूप उत्त्सुक होते. तर आता मी तुझी अधिकृतरित्या पत्नी झाले आहे. आता ही आनंद व्यक्त करण्याची वेळ आहे. चला आपण एकत्र आयुष्य जगूया. मी तुझ्यावर खूप प्रेम करते“… दोघांच्या या पोस्टवर अगदी काही क्षणांत मिलिन्समध्ये लाईक आणि कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोशल मीडियावर नेटकरी आणि कलाकार मंडळी या नवोदित जोडप्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत.

================================

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 6 च्या घरातली स्पर्धक Tanvi Kolte चं इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब…

================================

दरम्यान, बऱ्याच महिन्यांपासून विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत आहेत असं काही फोटोमधून हिंट्स मिळत होत्या… परंतु, दोघांनी ऑफिशिअली काहीच न सांगितल्यामुळे संभ्रम होता. मात्र, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघांनी आपल्या नात्याची अधिकृतपणे कबूली दिली होती. आणि त्यानंतर आज २६-०२-२६ या खास तारखेला दोघांनी आपल्या जवळच्या नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या साक्षीने लग्न केलं आहे. (South Indian Celebrity Couples)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Entertainment rashmika and vijay marriage photos Rashmika Mandanna vijay devarkonda VIROSH VIROSH wedding
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.