Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट

Shahid Kapoor : “मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली तर…”

Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे

Bigg Boss Marathi 6: टभाऊचा धक्का’मध्ये संतापाचा स्फोट; ‘उठा, निघा,

नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं Tighi मधील ‘शारदा सरिता’ गाणं

“Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान

Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!

“तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये

क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rashmika & Vijay Devarkonda : २६ फेब्रुवारी, उदयपूर….

 Rashmika & Vijay Devarkonda : २६ फेब्रुवारी, उदयपूर….
कलाकृती विशेष

Rashmika & Vijay Devarkonda : २६ फेब्रुवारी, उदयपूर….

by दिलीप ठाकूर 20/01/2026

शीर्षकच इतकं आणि असं बरंच काही सांगतेय की, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूर येथे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा अतिशय भव्य दिव्य दिमाखदार पध्दतीने थाटात विवाह सोहळा पार पडणार आहे. बरं ही तारीख त्यांनी लग्नाचा एक चांगला मुहूर्त पाहून ठरवली आहे की, दोघांच्याही अतिशय बिझी शूटींग शेड्युल पाहून ठरवली आहे, हे त्यांचे त्यांनाच माहित. या सेलिब्रिटींना लग्न करण्याचा विचार करताना, तारीख ठरवताना फार फार कटकटी असतात हो.(Rashmika Mandanna &Vijay Devrkonda Marriage)

मुमताजने लग्नाच्या बेडीत अडकताना हाती असलेले हरमेश मल्होत्रा दिग्दर्शित ‘लफंगे’ वगैरे चित्रपट पूर्ण करण्यासाठी निर्माता आणि दिग्दर्शकांना सांगितले. आणि नवीन चित्रपट स्वीकारायचा नाही असा निर्णय घेतला. तरी तिला आपला हुकमी हिरो राजेश खन्नाच्या फार फार आग्रहास्तव राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’ स्वीकारावा लागला. या चित्रपटाचा मुहूर्त होताना त्यात मौशमी चटर्जी प्रेमाचा तिसरा कोन होती. शशी कपूर दुसरा नायक होता. आपल्याला लकी असलेली मुमताज या चित्रपटात असेल तर ते अधिक उत्तम. त्या काळातील गॉसिप्स मॅगझिनना‌‌ ही एक धमाकेदार स्टोरी मिळाली. ती हवीच असते. आणि मुमताजने मौशमी चटर्जीची जागा घेतल्यावर तर चर्चा होणारच. मौशमी चटर्जी लग्न केल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टी आली आणि स्टार झाली. (Mumtaz)

कलाकारांच्या लग्नाला वळणं अनेक. हिंदी चित्रपटसृष्टीतील बो डेरेक अशी इमेज झालेल्या किमी काटकरच्या लग्नाची गोष्ट तुम्हाला माहितेय का? तिने अचानक आपला प्रियकर शंतनु शेवरेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिने काय केले तर नुकताच साईन केलेला हॅरी बवेजा दिग्दर्शित ‘त्रिनेत्र’ हा चित्रपट सोडला. या चित्रपटाच्या गीत ध्वनिमुद्रणाने झालेल्या मुहूर्ताला किमी काटकर हजरही होती. पण त्यापेक्षाही आपलं लग्न महत्त्वाचे मानले आणि हा चित्रपट सोडला. मिथुन चक्रवर्ती नायक असलेल्या या चित्रपटासाठी वर्षा उसगांवकरला असलेली ऑफर तिने नाकारली आणि शिल्पा शिरोडकरची वर्णी लागली. तिनेही‌ झक्कास कामगिरी केली. किमी काटकरचा विसर पडला असं काही नाही. पण शिल्पा शिरोडकरचा आपला एक स्क्रीन प्रेझेन्स होता.

अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाचे हे असे काही वेगळंच असतं. अभिनेत्रीने लग्न केले रे केले तिची लोकप्रियता ओसरते अशी अनेक वर्षे खुळचट कल्पना होती. लग्नाला तब्बल सव्वीस वर्षं होऊन देखील माधुरी दीक्षित-नेने आजही लोकप्रिय आहे. आज एखाद्या दागिन्यांच्या दुकानाच्या उद्घाटनाला ती येते आहे असं समजलं तरी त्या स्पॉटला गर्दीचा वेढा पडतोच. एखाद्या सेलिब्रिटीची लोकप्रियता त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेण्यासाठी किती गर्दी जमते यावरूनही मोजता येते. लोकप्रियता मोजता न येणारी अशी बहुरंगी बहुढंगी असते. (Entertainment News)

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी आपल्या ग्लॅमरस लग्नाची तारीख खूपच अगोदर जाहीर केल्याने साऊथची चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांना आपल्याला या शानदार सोहळ्याचं महागडं आमंत्रण आलेच तर उदयपूरच विमानाचे तिकीटं, उंची हॉटेलमधील आपल्या राहण्याची सोय असे सगळेच आताच पाहता येईल. दिवस भरभर सरकत आहेत. या शाही लग्न सोहळ्यासाठी नवीन कपडे, चप्पल, बूट, सुट घ्यायला हवे. तो एक्सलुझिव्ह असावा. रेड कार्पेटवर आपण जास्त भाव खाणारे ठरावे. मिडिया तर इतका असेल की फ्लॅश धडाधड उडताच सोशल मीडियात भरभर रिल पोस्ट होतील. त्या दिवशी म्हणजेच २६ फेब्रुवारीला हे चकाचक लग्न ट्रेडिंगवर पहिल्या क्रमांकावर असेल.

मिडियावाले, इनफ्ल्युअन्सर यांची आतापासूनच घाई. संपूर्ण उदयपूरला जणू चमचमत्या दिव्यांची आरास. रश्मिका उखाणा कोणत्या भाषेत घेईल याचीही उत्सुकता आणि मग त्याचीही बातमी. त्या उखाण्याचे लेखन कोणाचे हा उपप्रश्न आहेच. या दाम्पत्याची वेशभूषा, रंगभूषा, केशभूषा हे सगळेच महत्वाचं. आपल्या हाती आधुनिक तंत्रज्ञानाचा कॅमेरा असलेला चांगला. पन्नास साठ वर्षांतील चित्रपट कलाकारांची लग्न हा एक वेगळाच माहिती आणि मनोरंजनाचा विषय

================================

हे देखील वाचा : Madhuri Dixit जेव्हा सिंगल स्क्रिन जया थिएटरमध्ये ‘हम आपके है कौन?’ च्या विशेष खेळास आली होती…

================================

सोशल मीडियात आतापासूनच या लग्नाचा ताशा वाजू लागला आहे. बॅण्ड पथक तयार आहेच. अक्षताही तयार आहेत. या लग्नाच्या लाईव्ह कव्हरेजचे हक्क एखाद्या उपग्रह वाहिनीला हवे असतील तर त्या प्रक्षेपणाची किंमत विक्रमी असेल हे नक्की. एक्सलुझिव्ह कव्हरेज आहे हे. बहुभाषिक माध्यम समूहाला निश्चित उपयुक्त. आज अनेक लहान मोठ्या गोष्टींना विक्री मूल्य आले आहे, ते सेलिब्रिटीजच्या लग्नाच्या गोष्टीलाही आहेच आहे… आणि स्टार असल्याची पुरेपूर किंमत का वसूल करु नये? या लग्नाचे एकूणच बजेट किती असेल हो? मोजायचे नाही म्हणता? काही हरकत नाही. हिशोब मांडून सेलिब्रिटी कोणतीच गोष्ट करीत नाहीत. लग्न तर नाहीच नाही. तो एक मनसोक्त मनमुराद आनंद सोहळा. त्याची किंमत ती काय? (Celebrity Marriage News)

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update Celebrity News Entertainment Entertainment News rashmika and vijay marriage Rashmika Mandanna udaipur vijay devarkonda
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.