Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rashmika Mandanna : हुकमी फिल्मी अड्डा…. विमानतळ

 Rashmika Mandanna : हुकमी फिल्मी अड्डा…. विमानतळ
कलाकृती विशेष

Rashmika Mandanna : हुकमी फिल्मी अड्डा…. विमानतळ

by दिलीप ठाकूर 06/02/2026

सोशल मीडियात नुसती नजर टाकली रे टाकली की त्यात रश्मिका मंदाना अतिशय उत्साहाने एक तर‌ विमानतळावर येत असते अथवा विमानतळावरुन छान हसत हसत बाहेर पडत असते. या चालण्यात तिच्यावर धडाधड फ्लॅश उडत असतो, त्यातच कोणी चाहता अथवा फोटोग्राफरने केलेली सेल्फीची इच्छा ती पूर्ण करते. विमानतळावरची हुकमी सेलिब्रिटीज म्हणजे रश्मिका मंदाना असा एक पुरस्कार तिला द्यायला हवा. आणि त्यात काहीही गैर नाही. एक म्हणजे चित्रीकरणाच्या निमित्ताने ती देशविदेशातील अनेक ठिकाणी जाताना विलक्षण उत्साहात असल्याचे इंस्टाग्रामवर रिल पाहताना दिसते आणि कितीही जवळचा अथवा लांबचा प्रवास करुन आली तरी ती कंटाळलेली नसते. आवर्जून शिकण्यासारखी ही गोष्ट आहे.

आता तुमच्या मनात कदाचित प्रश्न असेल की, विमानतळावर मिडियाची अशी काही ड्युटी वगैरे वगैरे असते काय? विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीलाही विमानतळ कव्हरेजचे भाग्य लाभते. चित्रपट, मॉडलिंग, क्रिकेट यातील आणखीन काही सेलिब्रिटीजही अशा पध्दतीने ये जा करताना सोशल मीडियात दिसतात. अशा पोस्टना भरपूर लाईक्स आणि कमेंट्सही मिळतात. त्या मिळतात म्हणून तर अशा पोस्ट शेअर होतात. हे सगळे पाहून पाहून मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री मला म्हणाली, “मी इतकी देश विदेशातून भटकंती करत असते, मला तर कधीच असे विमानतळावर फोटोग्राफर्स दिसत नाहीत, मलाही असे चमकायला आवडेल”. तिचा हेतू चांगला आणि प्रामाणिक होता. आपण स्टार आहोत तर कसेही करून फोकसमध्ये राह्यला हवे. एक दिवस आपण सोशल मीडियावर दिसलो नाही तर आपण मनोरंजन क्षेत्रातून बाहेर फेकलो गेलो आहे असे कोणाला तरी वाटू लागेल अशी भीती वाटत असेल तर काही सांगता येत नाही.

विमानतळावर असो,‌ पाश्चात्य रंगढंगाचे छान छोकी रेस्टॉरंट असो, आपण असं कुठेही आलो, गेलो, थांबलो हे सोशल मीडियावर व्हायरल व्हायला हवे तर त्या सेलिब्रिटीजला एक चांगला पीआर हवा. आणि त्याच्या नेमणूकीत व्यावहारिक दृष्टिकोन हवा. आजच्या ग्लोबल युगातील कमर्शियल वातावरणात फुकट काही मिळेल अशी अपेक्षा तरी कशी ठेवायची? सेलिब्रिटीचचा स्पॉट रिपोर्ट हे एक बिझनेस डिल आहे.

फार पूर्वी अनेक सिनेपत्रकार हे काही कलाकारांचे निस्सीम चाहते असते. चित्रपटावर भरभरुन प्रेम करीत असतानाच त्यांचा आपला अतिशय आवडता कलाकार अथवा संगीतकार असे. भाऊ पाध्ये वहिदा रेहमानचे निस्सीम चाहते, शिरीष कणेकर दिलीपकुमारचे एकनिष्ठ चाहते आहेत हे कधीच लपले नाही, ती त्यांची एक वेगळी ओळखही झाली, हेमा मालिनीच्या भूमिकेच्या चित्रपटाच्या आम्हा सिनेपत्रकारांच्या खेळास शरद गुर्जर यांना हेमा मालिनीचा फोटो आवर्जून दिला जाई आणि तो फोटो लोकसत्तातील आपल्या शुक्रवारच्या परीक्षणात प्रसिद्ध करत. यात आपुलकी असे. चित्रपटाच्या इतिहासावर, वाटचालीवर निस्सीम प्रेम करणे, अभ्यास करणे ही मिडियात निस्सीम भावना होती.

महत्वाचं म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार असो, त्याला न विचारता त्याचा सार्वजनिक स्थळावर फोटो काढला जात नसे. तेवढे आणि तसे सांस्कृतिक, सामाजिक व माध्यम क्षेत्रातील वातावरण होते, सभ्यता संस्कृती होती. स्वतंत्र फोटो सेशन आयोजित करण्यात येत. गौतम राजाध्यक्ष यांच्या गिरगाव, ऑपेरा हाऊस येथील प्रशस्त घरी टाॅपचे सेलिब्रिटीज एक्सलुझिव्ह फोटो सेशनसाठी येत. नव्वदच्या दशकात एकदा गौतम राजाध्यक्षनी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांना फोटो सेशनसाठी एकत्र आणले ही जणू ब्रेकिंग न्यूज ठरली. याचं कारण अनेक वर्षे ते एकमेकांपासून दूर होते. त्यांच्यात इगो प्राॅब्लेम असल्याचे गाॅसिप्स मॅगझिनमधून रंगवून खूलवून वाढवून शिजवून लिहिले जाई.अमिताभ बच्चनने खास पुढाकार घेऊन मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांना एकत्र आणून इंडिया टुडेच्या मुखपृष्ठाच्या फोटो सेशनसाठी एकत्र आणले हीदेखील एक्सलुझिव्ह गोष्ट.

================================

हे देखील वाचा : विक्रम भट्टच्या Kasoor चित्रपटाची पंचवीशी….

================================

तो काळ वेगळा होता. वातावरण वेगळे होते. आजच्या डिजिटल युगात अस्तित्वाची स्पर्धा आहे तसेच आपण कधी कुठे येतोय जातोय हे सतत सांगत राहण्याची गरज वाटू लागलीय. या सगळ्यातून विमानतळावर सेलिब्रिटीज आला रे आला की फ्लॅश धडाधड उडणारच. सीसीटीव्ही, मोबाईल कॅमेरा यांच्या युगात काहीच लपून राहणारे नाही हे जसे खरे तसेच आपण किती दिसत राह्यचे याचाही विचार करणं म्हटलं तर आवश्यक. अन्यथा जे चाललंय ते छान आहे. चला, रश्मिका मन्दानाचा विमानतळावरचा व्हिडिओ पाहायचाय…

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Entertainment News Indian Cinema Rashmika Mandanna rashmika mandanna marriage vijay devarkonda
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.