Salman Khan च्या हिरोईनच्या भूमिकेत दिसणार Rashmika Mandanna,’सिकंदर’मध्ये होणार धमाकेदार एन्ट्री
‘अॅनिमल‘ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. रश्मिका मंदानाच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे, ज्यात ती सलमान खानची हिरोईन म्हणून दिसणार आहे. कारण रश्मिका मंदानाने आता ‘सिकंदर’सिनेमात मध्ये एन्ट्री होणार आहे. ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित हा चित्रपट २०२५ च्या ईदला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून रश्मिका मंदानाच्या चित्रपटातील प्रवेशाची घोषणा केली आहे, ज्यात ‘अॅनिमल’ अभिनेत्री रश्मिकाचे स्वागत करण्यात आले आहे.(Rashmika Mandanna in Salman Khan Sikandar)
अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास आणि निर्माते साजिद नाडियावाला यांच्यासोबत रश्मिका मंदानाचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. लोकप्रिय तमिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदानाने अमिताभ बच्चन यांच्या ‘गुड बाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू‘ आणि नंतर रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’मध्ये दिसली. रश्मिका ‘छावा‘ या चित्रपटात विकी कौशलसोबत दिसणार आहे. तर ऑगस्टमध्ये रश्मिका मंदाना ‘पुष्पा २‘ या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. याशिवाय रश्मिका तमिळ चित्रपट कुबेरामध्ये ‘धनुष’सोबत दिसणार आहे.
ईदच्या दिवशी सलमान खानने ए आर मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर‘ चित्रपटाची घोषणा केली होती. सलमान खानने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यासाठी पोस्ट शेअर केली होती. त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘या ईदला ‘बडे मियां छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ पाहा आणि पुढच्या ईदला ‘सिकंदर’ला येऊन भेटा. ईद मुबारक.”ए. आर. मुरुगदास यांनी आमिर खानच्या ‘गजनी‘ या चित्रपटातून हिंदीत पदार्पण केले होते. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १०० कोटींची कमाई करून अनेक विक्रम मोडले. मुरुगदास यांनी अक्षय कुमार स्टारर ‘हॉलिडे : अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी’ या चित्रपटाचे ही दिग्दर्शन केले होते.
====================================
====================================
सलमान खान अनेक वर्षांपासून ईदला आपले सिनेमे घेऊन येत आहे. ईदला प्रदर्शित होणारा अभिनेत्याचा पहिला चित्रपट १९९७ मध्ये ‘जुडवा‘ होता. तेव्हापासून ईदच्या रिलीजद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करण्याची त्याला सवय लागली आहे. ईदच्या मुहूर्तावर ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘भारत’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ यांसह त्याचे अनेक हिट चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, गेल्या वर्षी ईदच्या दिवसा व्यतिरिक्च ‘टायगर ३’ चित्रपटगृहात आल्यानंतर त्याने हा ट्रेंड मोडला होता.