Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल क्रश’

 Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल क्रश’
कलाकृती विशेष

Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल क्रश’

by रसिका शिंदे-पॉल 12/03/2025

‘नॅशनल क्रश’ हा टॅग मिळवणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या टॉलिवूडच नाही तर बॉलिवूडपण गाजवतेय. एकामागून एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रश्मिकाच्या तीन चित्रपटांनी लागोपाठ ५०० कोटींचा बॉक्स ऑफिसवर टप्पा पार करत नवा इतिहास रचला. सध्या दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत रश्मिका ही केवळ एकच अभिनेत्री आहे जिच्या नावावर ५०० कोटी कमावणाऱ्या तीन चित्रपटांची नोंद आहे. लवकरच रश्मिका सलमानसोबत ‘सिकंदर’मध्ये (Sikandar) स्क्रिन शअर करणार आहे. जाणून घेऊयात जरा नॅशनल क्रशबद्दल…(Bollywood film update)

कर्नाटकातील कुर्ग मध्ये जन्मलेल्या रश्मिका (Rashmika Mandanna) हिचं शालेय शिक्षण कुर्गमध्येच झालं. आपल्या गावाशी आणि संस्कृतीशी तिची नाळ घट्ट जोडली आहे, याची प्रचिती बऱ्याचदा तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट होणाऱ्या धार्मिक स्थळांच्या भेटी किंवा कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांतून सिद्ध होतंच. रश्मिकाने सायकॉलॉजी, जर्नेलिजम आणि इंग्रजी लिट्रेचरमध्ये पदवी प्राप्त केली आहे. चित्रपटात काम करण्याची तिची आधीपासूनच इच्छा होती खरं आणि त्याचा प्रवास झाला मॉडेलिंगपासून. (Entertainment News)

कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करणाऱ्या रश्मिकाला ‘कांतारा’ (Kantara) फेम दिग्दर्शक रिषभ शेट्टी यांनी पाहिलं होतं आणि त्यांनी Kirin Party या कन्नड चित्रपटातून तिला ब्रेक दिला आणि २०१६ मध्ये रश्मिका मंदानाची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली. त्यानंतर रश्मिकाने ‘चलो’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘भीश्म’, ‘सुलतान’, ‘सिता रामम’, ‘यजमाना’ अशा तेलुगू, कन्नडा, तमिळ चित्रपटांमध्ये कामं केली. (Tollywood Movies)

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये रश्मिकाचे चाहते होतेच पण ‘पुष्पा १’ (Pushpa 1) या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतही तिचा जम बसू लागला. आणि संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने केलेली एन्ट्री धमाकेदार ठरली. ‘अॅनिमल’च्या यशानंतर ‘पुष्पा २’ (Pushpa 2) आला त्यातही तिने अल्लू अर्जूनसोबत साऊथसह हिंदीचंही मार्केट खाऊन टाकलं. त्यानंतर लक्ष्मण उतेकर यांच्या ‘Chhaava’ या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशल सोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या रश्मिकाने याही संधीचे सोनं करत पुन्हा बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींची मजल मारली. (Bollywood masala)


===========

हे देखील वाचा :Chhaava Box Office : हर हर महादेव! ‘छावा’ची ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

===========

इतकंच नाही, तर अभिनेत्री Deepika Padukone हिलादेखील रश्मिकाने मागे टाकत ५०० कोटी चित्रपटांचा तिचाही रेकॉर्ड मंदानाने मोडला आहे. लवकरच रश्मिका सलमान खान सोबत सिकंदर या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, मॅडॉक फिल्म्सच्या ‘थामा’. (Thama) या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटात ती आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) सोबत झळकणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहेत. त्यामुळे ‘’छावा’ नंतर आणखी एका मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात रश्मिका दिसणार आहे. (Rashmika’s upcoming Movies)

रश्मिकाची गाडी खरं तर सध्या चांगलीच भरधाव वेगात आहे. एकामागून एक हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपटात तीच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘सिकंदर’ आणि ‘थामा’ नंतर ‘Animal Park’ या हिंदी ‘Kubera’ या तमिळ, ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘पुष्पा ३ : द रेंम्पेज’ या तेलुगू चित्रपटात. ती दिसणार आहे. त्यामुळे पुढची २-३ वर्ष रश्मिका मंदाना तुफान गाजवणार असं दिसून येत आहे. (Bollywood upcoming super hit movies)

रसिका शिंदे-पॉल

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Allu Arjun Animal Bollywood Bollywood News bollywood tadaka Chhaava entertainemnt masala pushpa 1 pushpa 2 Rashmika Mandanna salman khan sikandar thama Tollywood Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.