
Rashmika & Vijay : ‘विरोश’च्या हळदीचे खास फोटो आले समोर; पिवळ्या फुलांची आरास आणि बरंच काही…
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. उदयपूमध्ये त्यांच्या प्रीवेडींग कार्यक्रमांना सुरुवात झाली असून रश्मिका आणि विजय त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मिडियावरुन स्टोरीजच्या माध्यमातून काही फोटो शेअर करत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी दोघांनी क्रिकेट लीग आणि इतर कार्यक्रमांटे फोटो शेअर केले होते. आणि आज २५ फेब्रुवारी रोजी हळदीचे क्षण प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत. (Rashmika Mandanna & Vijay Devarkonda)
विजय देवरकोंडाने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या फोटोत फुलांच्या चादरीने सजलेला स्टेज, मध्यभागी टेबल, बाजूला छान पिवळ्या फुलांचा सडा आणि दोघांच्या नावाचे रुशी आणि विजय (Rushie & Vijay) असे बोर्ड लावलेले दिसत आहेत. एकूणच अगदी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. (VIROSH haldi photos)

तसेच, उद्या म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी रश्मिका आणि विजय लग्नबंधनात अडकणार असून अगदी ऱाजगी पद्धतीने त्यांनी त्यांचा विवाह सोहळा प्लॅन केला आहे. मुळात मिळालेल्या माहितीनुसार अगदी घरातील नातेवाईक आणि मित्र या समारंभाला उपस्थित राहणार असं सांगितलं जात होतं. परंतु, संपूर्ण अंबानी कुटूंब उदयपूर एअरपोर्टवर स्पॉट झाल्यामुळे आता अंबानी देखील विजय आणि रश्मिकाला आशिर्वाद देण्यासाठी पोहोचले आहेत हे फिक्स झालं आहे. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!
================================
दरम्यान, उदयपूरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. यावेळी फिल्मी दुनियेतील कलाकार मंडळींना आमंत्रित केलं जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून ज्या दिवसाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते त्या VIROSH च्या लग्नाचा दिवस आला असून आता दोघांचे फोटो पाहण्यासाठी लोकं उस्तुक आहेत. (Rashmika & Vijay Marriage)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi