Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

विजय देवरकोंडासोबत साखरपूडा झाल्यानंतर Rashmika Mandanna ची ‘ती’ पोस्ट व्हायरल!
बऱ्याच महिन्यांपासून सुरु असणारी चर्चा अखेर खरी ठरली आहे… रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी गुपचूप साखरपुडा उरकून घेतलाय… आता दोघांनी जरी ऑफिशली अनाऊन्स केलं नसलं तरी विजयच्या टीमकडून यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे… आणि आता साखरपूड्यानंतर रश्मिकाची सोशल मिडियावरची पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली असून काही जणं तिच्या या पोस्टमुळे नाराज देखील झाले आहेत… काय आहे रश्मिकाची पोस्ट जाणून घेऊयात…(Rashmika and Vijay Engagement)

रश्मिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं आहे की, “मला माहीत आहे की, तुम्ही सगळे याची वाट पाहत होतात”, असे लिहित तिने तिच्या आगामी ‘द गर्लफ्रेंड’ (The Girlfriend) या चित्रपटाबद्दलव अपडेट दिली आहे… हा चित्रपट ७ नोव्हेंबरला तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड व मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही तिने जाहीर केले… रश्मिकाने या पोस्टसोबत ‘द गर्लफ्रेंड’ (The Girlfriend movie) चित्रपटाचा टीझरही शेअर केला आहे… या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि दीक्षित शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत…(Rashmika Mandanna movie 2025)
================================
हे देखील वाचा : स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!
=================================
दरम्यान, रश्मिका लवकरच मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्समधील ‘थामा’ (Thama Movie) या चित्रपटात आयुष्यमान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत स्क्रिन शेअर करणार आहे… या व्यतिरिक्त तिचे ‘म्यासा’, ‘पुष्पा ३’ (Pushpa 3), ‘रेनबो’, ‘अॅनिमल पार्क’ (Animal Park) हे चित्रपटही येणार आहेत… (Rashmika Mandanna movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi