Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

“Ramayana हा चित्रपट एक एक यज्ञ आहे”; लक्ष्मण साकारणाऱ्या लक्ष्मण दुबेने व्यक्त केली भावना
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत… जवळपास ४००० कोटींचं बजेट असणारा बॉलिवूडमधला हा पहिला चित्रपट आहे… या पौराणिक चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार असून सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे… तसेच, लक्ष्मणाची भूमिका रवी दुबे (Ravie Dubey) साकारणार आहे… नुकत्याच एका मुलाखतीत त्याने सेटवरील अनुभव आणि मुख्य कलाकारांच्या मेहनतीबद्दल भाष्य केलं आहे… (Entertainment News)

रवी दुबे याने रणवीर अल्लाहबादियासोबतच्या पॉडकास्टमध्ये ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील वातावरणाबद्दल सांगताना म्हटलं की, ”अनेक चित्रपटांच्या सेटवर खूप गोंधळाचं वातावरण असतं, पण ‘रामायण’ चित्रपटाचं शूटिंग घड्याळ्याच्या काट्यानुसार शिस्तबद्ध पद्धतीने असायचं. एकही शिफ्ट वाढवली गेली नाही आणि प्रत्येकजण वेळेवर तयार असायचा.” (Ravi Dubey)

पुढे रवी म्हणाला की, “ती भूमिका (लक्ष्मण) मिळाल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला. प्रेक्षकांना खोटं काम लगेच कळतं, त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्यासाठी मला स्वतःमध्ये फार बदल करावे लागले. मी माझी संपूर्ण दिनचर्या बदलली. खरं तर, रणबीर कपूरसह आम्हा सर्वांनीच हे बदल केले आहेत. रणबीरने या चित्रपटासाठी खूप त्याग केला आहे. हा संपूर्ण अनुभव एका ‘यज्ञा’सारखा वाटत होता. आम्ही सर्वांनीच या पात्रांशी प्रामाणिक राहण्यासाठी आमच्या स्वभावात, हावभावांमध्ये आणि बोलण्यातही बदल करण्यासाठी शक्य ते सर्व केलं.”(Ranbir Kapoor Movies)
================================
हे देखील वाचा : ‘रामायण’ चित्रपटात Amitabh Bachchan साकारणार ‘ही’ भूमिका!
================================
दरम्यान, नितेश तिवारींच्या ‘रामायण’ मध्ये साई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश (Yash) याचा हा चित्रपट बॉलिवूडचा डेब्यु असणार आहे… तसेच, यांच्यासोबत लारा दत्ता, सनी देओल, काजल अग्रवाल अशा बऱ्याच कलाकारांची फौज चित्रपटात दिसणार आहे… ‘रामायण’ या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi