
Ravi Jadhav : “दोन ऐवजी चार पैसे खर्च करा पण…”; अखेर ‘बाल शिवाजी’ चित्रपट का रखडला याचं कारण आलं समोर!
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairaat) चित्रपटातून एका रात्रीत सुपरस्टार झालेला अभिनेता आकाश ठोसर सध्या मोठ्या पडद्यापासून लांब आहे. झुंड चित्रपटानंतर फारसा लाईमलाईटमध्ये न आलेला आकाश रवी जाधव दिग्दर्शित ‘बाल शिवाजी’ (Baal Shivaji) चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. परंतु, हा चित्रपट नेमकी कुठे रखडला याचं उत्तर रवी जाधव यांनी दिलं आहे. नेमकं काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊयात…
अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बरेच चित्रपट आले. या गर्दीत रवी जाधवांचा बाल शिवाजी चित्रपट हरवलाच. आता नेमका तो का नाही आला किंवा त्याचं काय झालं याचं उत्तर नुकत्याच एका मुलाखतीत रवी जाधव यांनी दिलं. ते म्हणाले की, ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji)सारखं बजेट मराठीत खूप कमी स्टुडिओ देऊ शकतात त्यामुळे माझ्याकडे इतक मोठं बजेट असणार नाही. मग छोट्या बजेटमध्ये मी काय करू शकतो? मला सिनेमामध्ये आई आणि मुलाची गोष्ट सांगायची होती. त्या सिनेमात युद्धाचे सीन जास्त नसतील तर माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, ते कसे घडले हे दाखवायचं होतं. म्हणूनच मी बाल शिवाजीची घोषणा केली. त्या सिनेमाची गोष्ट लिहून झाली आहे”… (Ravi Jadhav)

पुढे रवी म्हणाले की, “निर्माते मिळाल्यानंतरच मी पोस्टर टाकलं होतं. पण पुढे मला असं वाटलं की, या सिनेमासाठी निर्माता असा पाहिजे ज्याची या गोष्टीवर भक्ती असेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमाचा फक्त व्यवसाय होऊ शकत नाही. व्यवसाय असेल कारण त्यात ज्याची इन्व्हेस्टमेंट असेल त्याला त्याचे पैसे मिळालेच पाहिजेत. पण यासोबतच भक्ती सुद्धा हवी. दोन ऐवजी चार पैसे खर्च करा पण सिनेमात असंच करूया… असं म्हणणारा निर्माता मी शोधत आहे.” (Aaksh Thosar)
रवी जाधव पुढे असं देखील म्हणाले की, “सध्या इंडस्ट्रीमध्ये अनरियल इंजिन नावाचा एक नवीन तंत्रज्ञान आलंय. त्यावर मला हा सिनेमा एकाच स्टुडिओमध्ये करायचा आहे. त्याचाही शोध सुरू आहे. मला बाल शिवाजी सिनेमा अशा पद्धतीने करायचाय ज्यातून मला सुद्धा काहीतरी नवीन शिकायला मिळेल. दिवसेंदिवस मला त्याबद्दल बरंच नाव काहीतरी सुचत असतं. जसजसे इतिहासातले नवीन संदर्भ येतात तसतसं मला आणखी मजा येते. 2015 पासून छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करायचं माझं स्वप्न होतं ते मी नक्की पूर्ण करणार”…
================================
================================
दरम्यान, रवी जाधव यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास टाइमपास, न्यूड, बालक पालक, टाइमपास 2, टाइमपास 3, नटरंग, बालगंधर्व, मै अटल हू, बायोस्कोप, रंपाट यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. तसेच, लवकरच ‘टाईमपास ४’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता असल्याचे संकेतही नुकतेच रवी यांनी दिले आहेत. त्यामुळे बऱ्याच काळापासून दिग्दर्शनापासून लांब असलेले रवी काहीतरी हटके प्रेक्षकांच्या भेटीला आणणार हे निश्चित…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi