
‘व्ही शांताराम’ यांचा बायोपिक Ravi Jadhav डिरेक्ट करणार होते?
भारतीय चित्रपटसृष्टीतील ग्रेट दिग्दर्शक व्ही शांताराम (V.Shantaram) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. भारतीय चित्रपटांना जागतिक दर्जा मिळवून देणाऱ्या चित्रपतींचा प्रवास या भव्य चित्रपटात मांडण्यात येणार असून शांताराम बापूंची भूमिका अभिनेता सिद्धात चर्तुर्वेदी साकारणार आहे. पण, तुम्हाला माहित आहे का? या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव करणार होते. हो. लागला ना शॉक. पण आता त्यांनी दिग्दर्शनातून माघार का घेतली आहे? जाणून घेऊयात. (Indian Cinema History)
तर, रवी जाधव यांनी मराठीत ‘बालगंधर्व’, ‘नटरंग’, ‘टाईमपास’ असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले. मराठीत चित्रपटांची वेगळी शैली निर्माण करणारे रवी जाधव भारतीय चित्रपटसृष्टीला तंत्रज्ञान आणि आधुनिकतेची जोड देणाऱ्या शांताराम बापूंच्या बायोपिकचं दिग्दर्शन करणार होते. पण त्यांनीच या चित्रपटाना नकार दिला. त्याचं कारण नुकतंच एका मुलाखतीत स्वत: रवी जाधव यांनी सांगितलं आहे. अमोल परचुरेंच्या कॅचअपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे. (Ravi Jadhav Movie)

या मुलाखतीत रवी जाधव म्हणाले की, “‘व्ही. शांताराम’ हा चित्रपट माझ्याकडे आला होता, तेव्हा तो मराठीत करण्यासाठी आला होता. त्यावर आमचं पाच-सहा महिने काम झालं. पाच-सहा मीटिंग झाल्या. आम्ही शांताराम यांच्या कुटुंबीयांना वगैरे भेटलो. त्या मीटिंग झाल्या आणि अचानक सगळं शांत झालं. मग कळलं अभिजीत देशपांडे हा चित्रपट हिंदीत करतोय. मला याचा आनंद झाला की, तो हा चित्रपट हिंदीत करतोय. कारण मी निर्मात्यांना हेच सांगितलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं की, हा चित्रपट ‘व्ही. शांताराम’ आहे. ते फक्त महाराष्ट्रपुरते मर्यादित नसून ते जागतिक दर्जाचे दिग्दर्शक आहेत. तुम्ही हा चित्रपट हिंदीत करा. मला आठवतंय, ती आमची शेवटची मीटिंग होती”. (V. Shantaram Biopic)
पुढे रवी जाधव म्हणाले की, “मला वाटतं २०१९ पासून अभिजीत यावर काम करतोय. आधी अभिजीत हिंदी वेबसीरिज करणार होता. चित्रपटाचं पोस्टर आल्यानंतर मी अभिजीतला फोन करून सांगितलं की, ‘धन्यवाद तू हिंदीत हा चित्रपट घेऊन येत आहेस. मला मराठीत करण्यासाठी आला होता; तेव्हा मी त्यांना हेच सांगितलं होतं की इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा चित्रपट हिंदीतच यायला हवा आणि तो मोठ्या स्केलवरच व्हायला हवा. कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट मोठी केली. चित्रपटात त्यांनी प्रत्येक फ्रेम लार्जर दॅन लाईफ केली असून भव्यदिव्य सेट लावले. आता ते तुम्ही आम्हाला मराठीच्या बजेटमध्ये करायला सांगाल? त्यामुळे खरंच बरं झालं मी चित्रपट नाही केला”. (Entertainment News)

रवी जाधव यांनी निर्मात्यांबद्दल बोलताना असं देखील म्हटलं की, “असे खूप निर्माते येतात जे ४ करोडमध्ये व्ही. शांताराम करा असं म्हणतात. कसं करणार? वेड लागलं आहे का? त्यामुळे अभिजीतचं अभिनंदन. तो लढला. त्याला चांगले निर्माते मिळाले आहेत. मी त्याला फोन करून सांगितलं आहे. पहिलं पोस्टर तुमचं येतं, ते खूप बोलकं असतं आणि त्यासाठी मी त्याचं अभिनंदनही केलं आहे.”
================================
हे देखील वाचा : ठरलं!‘व्ही. शांताराम’ यांच्या बायोपिकमध्ये Siddhant Chaturvedi दिसणार प्रमुख भूमिकेत
================================
दरम्यान, व्ही शांताराम या चित्रपटात सिद्धांत चर्तुवेदी (Siddhant Chaturvedi), तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात त्यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवास दाखवण्यात येणार आहे. ज्या काळात बजेट ही तर फार मोठी बाब होतीच त्या काळात आधुनिक तंत्रज्ञान मराठी चित्रपटसृष्टीत आणण्याचं धाडस करत ते यशस्वीपणे पुर्ण करणाऱ्या ‘व्ही शांताराम’ यांचा या बायोपिक त्यांच्या प्रत्येक चित्रपटांप्रमाणेच हिट ठरणार यात तिळमात्र शंका नाही. या चित्रपटाची निर्मीती राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे हे या सिनेमाचे निर्माते आहेत. २०२६ मध्येच हा भव्य बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi