Dadasaheb Phalke यांच्या आधीही मराठी माणसाने चित्रपट तयार केला होता!

Son Of Sardar 2 :”मी संजय दत्तच्या जागी आलो कारण…”; रवी किशन यांनी केला खुलासा
सध्या अजय देवगण (Ajay Devgan) आणि मृणाल ठाकूर यांचा ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे… २०१२ मध्ये आलेल्या सन ऑफ सरदार या चित्रपटाचा हा सीक्वेल असून यात अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते… आता मात्र, दुसऱ्या भागात या दोन्ही कलाकारांचा पत्ता कट झालेला दिसत आहे… संजय दत्त यांची जागा रवी किशन यांनी तर सोनाक्षीची जागा मृणाल ठाकूर हिने घेतली आहे… दरम्यान, चित्रपटात संजय दत्त का दिसले नाही याचं कारण आता समोर आलं आहे… जाणून घेऊयात…(Bollywood News)

‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटात संजय दत्तच्या जागी रवी किशन (Ravi Kishan) दिसले आहेत… नुकत्याच एका कार्यक्रमात रवी यांनी संजय दत्त चित्रपटात का नाही आहेत याचं कारण सांगितलं आहे…’द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये या प्रश्नाचं उत्तर देताना रवी किशन म्हणाले की, ” एक दिवस अजय देवगणचा फोन आला आणि त्याने विचारलं, ‘रवी, काय करतोय?’ मी म्हणालो, ‘काही नाही, बोला’. तर तो म्हणाला, ‘यार, सन ऑफ सरदारमध्ये संजू बाबा येणार होते पण काही कारणाने त्यांचा व्हिसा रिजेक्ट झाला आहे. तर तू करशील?’. मी खूश झालो.”

रवी पुढे म्हणाले की, “संजय दत्त कल्ट माणूस आहे आणि त्याच्या जागी मला घेतलं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला आणखी एक सांगायचंय ते म्हणजे सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये सहसा फोकस हिरोवर असतो मात्र अजयने या सिनेमात माझ्याही भूमिकेला क्लायमॅक्समध्ये तेवढंच वजन दिलं आहे.” यावर, कपिलने अजयला विचारलं, ‘संजय दत्त पंजाबी आहे आणि रवीजी युपीचे, मग तरी त्यांना घ्यायचं कसं डोक्यात आलं?’ यावर अजय म्हणाला, “आम्ही त्यांचं कॅरेक्टर त्याच हिशोबाने ठेवलं आहे. यांच्या वडिलांना तीन पत्नी आहेत-एक पंजाब, एक बिहार आणि एक लंडन. तर रवी याचं कॅरेक्टर बिहारचं आहे.”(Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Ajay Devgan : ‘सन ऑफ सरदार २’ मधील आणखी एका गाण्यामुळे अजय झाला ट्रोल!
=================================
दरम्यान, विजय कुमार अरोरा यांनी ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटात अजय देवगण, मृणाल ठाकूर, रवी किशन, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर,शरत सक्सेना अशी भली मोठी स्टारकास्ट आहे… प्रेक्षकांना ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपट २५ जुलै २०२५ ऐवजी १ ऑगस्ट २०२५ रोजी पाहता येणार आहे. (Son Of Sardar 2 movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi