Janhvi Kapoor आणि Siddharth Malhotra यांच्या ‘परम सुंदरी’चं कलेक्शन झालं

Priya Marathe : ‘२ वर्षांपूर्वी ‘नमो रमो नवरात्री’मध्ये…’ रवींद्र चव्हाण यांनी प्रियाला वाहिली श्रद्धांजली!
मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं… गेले अनेक महिने तिची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर संपली… तिच्या निधनानंतर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्व शोकाकुल झालं असून कलाकारांनी तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.. तसेच, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी देखील प्रिया मराठे हिला श्रद्धांजली वाहिली आहे…(Marathi News)

रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टद्वारे प्रिया मराठे हिला आदरांजली वाहताना लिहिले आहे की, आपल्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारा प्रतिभासंपन्न अभिनेत्री प्रिया मराठे हिची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. ‘या सुखांनो या’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून पदार्पण करणारी प्रिया ‘चार दिवस सासूचे’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘तू तिथं मी’, ‘येऊ कशी मी नांदायला’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा अनेक मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचली होती. ‘पवित्र रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा अनेक हिंदी मालिकांमधून अभिनय करत तिने आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले होते. ‘२ वर्षांपूर्वी आपल्या ‘नमो रमो नवरात्री’ या उत्सवात प्रिया उपस्थित राहिली होती, तेव्हा तिच्याशी जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या होत्या. आज ही घटना ऐकून अतिशय दुःख झाले”. (Ravindra Chavan News)
पुढे चव्हाण यांनी असं देखील म्हटलं आहे की, “अल्पवयातच प्रियाचं निधन झाल्याने मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. तिच्या आत्म्यास सद्गती लाभो. मराठे आणि मोघे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, त्यांना या दु:खातून सावरण्याचे बळ लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.”
============================
हे देखील वाचा : लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
============================
प्रिया हिने फार कमी वर्षांमध्ये इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली होती… ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनु मोघे (Shantanu Moghe) याच्या तिने लग्न केलं होतं… दोघांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत एकत्र काम देखील केलं होतं… अतिशय कमी वयात सिनेसृष्टीतून अचानक प्रियाची झालेली एक्झिट प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi