Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Rekha नाही तर ‘उमराव जान’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती ‘या’ मराठी अभिनेत्रीला होती
सौंदर्याची खाण आणि अष्टपैलु अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या ‘उमराव जान’ (Umrao Jaan Movie 1981) चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४४ वर्ष पुर्ण झाली. आजही रेखा यांचं सौंदर्य लोकांना घायाळ करणारं आहे… ८०-९०चं दशकं आपल्या अभिनयाने गाजवणाऱ्या रेखा यांच्या करिअरमधील ‘उमराव जान’ हा चित्रपट टर्निंग पॉईंट नक्कीच ठरला होता.. मात्र, तुम्हाला माहित आहे का या चित्रपटासाठी रेखा नाही तर एका दिग्गज मराठी अभिनेत्रीला मुख्य भूमिका ऑफर केली होती… या चित्रपटाचे दिग्दर्शक मुझफ्फर अली यांनी एका मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासा केला आहे…(Bollywood Iconic movie)

‘उमराव जान’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मुजफ्फर यांनी ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना ४४ वर्षांपूर्वीचे काही खास किस्से सांगितले… यापैकी एक महत्वाचा किस्सा म्हणजे रेखा या चित्रपटासाठी पहिली पसंतीच नव्हत्या… अली म्हणाले की, “या चित्रपटासाठी सुरुवातीला मी अभिनेत्री स्मिता पाटीलचा (Smita Patil) विचार केला होता. तिनं माझ्याबरोबर ‘गमन’ या चित्रपटात काम केलं होतं आणि तिनं या चित्रपटातसुद्धा उत्तम काम केलं असतं असं माझं मत होतं”. दिग्दर्शक पुढे म्हणाले, “पण आम्हाला नंतर असं वाटलं की, चित्रपटासाठी अजून कोणीतरी वेगळी अभिनेत्री हवी, जिचे चेहऱ्यावरील हावभाव अजून खुलून येतील”.(Entertainment Tadaka)

पुढे रेखा यांच्याबद्दल बोलताना अली म्हणाले की “शेवटी रेखानेच ही भूमिका साकारली आणि तिनं भूमिकेच्या सादरीकरणाद्वारे संधीचं सोनं केलं. मी जेव्हा या भूमिकेबद्दल आणि सलमा सिद्दिकी यांच्या आवाजात चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा माझ्या डोळ्यांपुढे रेखा आली. ती तिच्या डोळ्यांतून ही कथा कशी सांगेल हा विचार मी केला आणि शेवटी तिनं अपेक्षित काम करीत तिच्या उत्तम सादरीकरणातून सगळ्यांची मनं जिंकली. मला असं नाही वाटत की, दुसरी कुणी ही भूमिका करू शकलं असतं”.(Bollyoood Masala)
================================
हे देखील वाचा: ती रेखा आहे म्हणून…
=================================
दरम्यान, रेखा यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘उमराव जान’ चित्रपटाने १९८१ साली ७.४३ कोटी कमावले होते… या चित्रपटाला ४४ वर्ष पुर्ण झाली असून नुकताच हा चित्रपट रि-रिलीज करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या स्क्रिनिंगला रेखा, आशा भोसले यांच्यासह इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती…(Umrao Jaan Re-release)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi