Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Sholay : हेड या टेल
शीर्षक वाचताच चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर ‘शोले’ मधील वीरु आणि जय यांच्यातील नाणेफेकीचे प्रसंग नक्कीच आले असणार.सलिम जावेद यांनी आपल्या पटकथेत या हेड या टेलचा अतिशय चतुराईने वापर करीत आपण रसिक प्रेक्षकांना अखेरीस छान चकमा दिला हेही आपण अनुभवतो.आजपर्यंत अनेक वेळा ‘शोले’ पाहणारे फिल्म दीवाने अगणित. आणि त्या प्रत्येक वेळेस याच हेड या टेलची रंगत नव्याने घेतली जातेय.’शोले’तील अनेक छोट्या छोट्या वैशिष्ट्यातील हीदेखील एक विशेष गोष्ट. रमेश सिप्पी दिग्दर्शित’शोले’ (प्रदर्शित अर्थात १५ ऑगस्ट १९७५)च्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त बरेच काही लिहिले/ बोलले/ सांगितले/ ऐकले जातेय. फोकस टाकला जातोय. अगदी मिम्स बनताहेत तसेच कल्पकतेने केलेले अडिच मिनिटाचे ॲनिमेशन सोशल मिडियात मोठ्याच प्रमाणावर व्हायरल होतेय. ‘शोले’ची पन्नाशी अशा अनेक गोष्टींसह साजरी होतेय. एखादा चित्रपट असा व इतका समाजमय होतो हेच कौतुकास्पद. ‘शोले’चे हेदेखील एक यशच. (Bollywood movies)

हेड या टेल ही नाणेफेक मिनर्व्हा चित्रपटगृहात सत्तर एमएमचा भव्य पडदा व स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम यात पाहणे कमालीचे थ्रीलींगफुल्ल असे.ते नाणे जणू आपल्याच आसपास पडलयं असे वाटे. ‘शोले’ फक्त पडद्यावरच राहिला नाही तर तो असा चित्रपटगृहातील अंधारातही सामावला.आपण प्रेक्षकांत मुरला. हेड या टेल हा अगदीच साधा प्रश्न राहिला नाही आणि त्या नाण्याची वस्तुस्थिती समजल्यावर तर आश्चर्याचा धक्का बसतानाच मैत्रीतील घट्ट नातेही अधोरेखित होते.(Untold story of sholay)

हेड या टेल नाणेफेकीचा संबंध खेळाशी. क्रिकेटमधील नाणेफेक कायमच कुतूहलाची. कारण नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी घ्यायची की क्षेत्ररक्षण याचा घेतलेला निर्णय खेळ सुरु झाल्यावर समजतो की योग्य होता की नव्हता ते… सिनेमात क्रिकेटचा डाव अनेकदा तरी आपण पाहत आलोय. त्यात आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’,नीरज पांडे दिग्दर्शित ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’,कबिर खान दिग्दर्शित ’83’या चित्रपटातील क्रिकेट रंगतदार. अशा चित्रपटांतूनही नाणेफेकीचे प्रसंग दिसले.तो खेळाचा भाग म्हणून आले.’शोले’तील नाणेफेक भावनाप्रधान ठरली,म्हणून कायमच लक्षात राहिली.आपणही प्रत्यक्ष आयुष्यात कधी मित्रांमध्ये तर कधी स्वतःसाठी नाणेफेक करतो पण आपल्याकडे छापा व काटा अशा दोन्ही बाजू असलेले व्यवहारातील नाणे असते.(Bollywood update)

चित्रपट व नाणे (वा नाणी)हा तसा खूपच रंगतदार विषय. फार पूर्वी म्हणजेच हाऊसफुल्ल गर्दीत सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांनी पिक्चर एन्जाॅय करण्याच्या युगात आवडते गाणे सुरु होताच पडद्यावर नाणी फेकली जात. हा दौलतजादा प्रेमातून यायचा. मा.भगवानदादा यांच्या ‘अलबेला'(१९५१) या चित्रपटातील ‘भोली सुरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन खोटे’ गाणे पडद्यावर सुरु होताच इंपिरियल चित्रपटगृहात पडद्यावर पैसे उडवले जात याचे किस्से गाजले. अनेक चित्रपट गीतांना असा जबरा प्रतिसाद मिळाला. चांद दिग्दर्शित ‘धर्मा’ (१९७३) या चित्रपटातील प्राण व बिंदू यांच्यावरील राज की बात कहदू तो या कव्वालीच्या वेळेसही पडद्यावर पैसे उडवले जात तसे कृपया करु नये असे चक्क या चित्रपटाच्या जाहिरातीत म्हटले गेले. चित्रपट शौकिनांनी मनापासून पडद्यावर पैसे उडवणे हीदेखील एक चित्रपट प्रेक्षक संस्कृती.त्याला कोणी ‘चिल्लर गोष्ट’ म्हणून हिणवू नये.तशा प्रेमातूनच आपल्या देशात चित्रपट रुजला,वाढला,फोफावला. (Entertainment)
================================
हे देखील वाचा: Lata Mangeshkar : ….नाहीतर आज लता दीदी चित्रपट निर्मात्या असत्या!
=================================
नाण्याचीच गोष्ट चाललीय म्हणून सांगायला हवे, पूर्वी अशी नाणी देऊनच थिएटरमध्ये पिक्चरचे तिकीट मिळायचे.आमच्या गिरगावातील सेन्ट्रल,इंपिरियल, स्वस्तिक या चित्रपटगृहात दिवसा तीन खेळाना स्टॉलचे तिकीट एक रुपया पासष्ट पैसे तर मॅटीनी शोला एक रुपया पाच पैसे असे होते.ताडदेवच्या डायना थिएटरमध्ये एका आठवड्यासाठी जुने चित्रपट प्रदर्शित होत आणि बॅकलॉग भरायची ती उत्तम संधी होती. तेथे स्टॉलचे तिकीट पासष्ट पैसे होते म्हणजेच पाच पैसे, दहा पैसे,चार आणे (पावली),आठ आणे असेच पैसे द्यावे लागत.त्यातही थ्रील होते हो. खिशात तेवढेच पैसे असत.पाच पैसे उरले तर ते गाणे सुरु होताच पडद्यावर उडवण्यात आनंद मिळे…(Bollywood reto news)

हेड या टेलचा ‘शोले’ तील प्रसंग त्या काळात फिल्मी गप्पांत फार चर्चेचा होता आणि ते नाणेही वेगळेच होते.आठवत असेलच म्हणा.एकदा चक्क उभेही राहते.हीच कल्पना दिग्दर्शक डेव्हिड धवनने ‘दीवाना मस्ताना (१९९७)मध्ये वापरली.
अनिल कपूर व गोविंदा हे जुही चावलावर इम्प्रेशन मारताना नाणेफेक करताना तेही नाणे असेच उभे राहते…’शोले’तील नाणेफेकची सर येणे शक्य नव्हतेच. तुम्हालाही माहित्येय ‘शोले’सतत रिपीट रनला रिलीज होतो,आताही पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजीही प्रदर्शित होतोय,पोस्टरवर फक्त त्यातले नाणे दाखवले तरी ते ‘शोले’चेच पोस्टर आहे असे नक्कीच समजेल हे तुम्हालाही पटतेय ना? हेड या टेलचा ‘सिक्का’च भारी आहे.खरी नाणी नेहमीच चालतात म्हणा.(Sholay movie)