Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

“चांगलं बोलता येत नसेल तर… “, ऐश्वर्या रायच्या ट्रोलिंगवरुन संतापली Renuka Shahane
अलीडकच्या काळात सोशल मिडियावर कधी, कोणता कलाकार कुठल्या कारणामुळे ट्रोल होईल काही सांगता येत नाही… आता सध्या बॉलिवूडचा एक काळ आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने गाजवणारी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे…. अभिषेक बच्चन सोबत लग्न आणि त्यानंतर मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या चित्रपटांपासून दूर गेली.. परंतु, रॅम्प वॉक अर्थात फॅशन शोपासून ती लांब राहू शकली नाही… गेल्या काही वर्षात कान्स, लॅक्मे अशा बऱ्याच फॅशन शोमधून तिने कमबॅक करत लोकांची तोंडं बंद केली… पण तिला बॉडी शेम केलं गेलं… आता तिच्याबाजूने बॉलिवूडची एक नायिका उभी राहिली आहे…
‘हम आपके है कौन’ चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रेणूका शहाणे तिच्या बोल्ड आणि बिंधास्त व्यक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते… आता तिने नुकत्याच झुमला दिलेल्या मुलाखतीत लॅक्मे फॅशन शोमुळे ट्रोल झालेल्या ऐश्वर्या रायच्या बाजूने उभं राहात ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे… रेणूका म्हणाली की, “तुम्ही इतकं जज कसं करु शकता? तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे तुम्ही यातून दाखवत आहात. यापेक्षा तुम्ही ऐश्वर्याने इतकी वर्षी सतत मिळवलेल्या यशाचं कौतुक करु शकत नाही का? पण लोक तिच्या आऊटफिटवरुन, बॉडीवरुन टीका करत आहेत. एखाद्या मोठ्या कंपनीला तुम्हाला काढून टाकायला एक मिनिट लागतो. पण ऐश्वर्या अनेक वर्षांपासून कंपनीची ब्रँड अँबेसिडर आहे. जर तुमच्याकडे चांगलं बोलायला काही नसेल तर तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा.

रेणूका पुढे असं देखील म्हणाली की, “अभिनेत्रींवर चांगलं दिसण्यासाठी खूपच दबाव आहे. सोशल मिडिया आल्यावर तर या जगात बरेच बदल झाले आहेत. सगळं अतीच झालं आहे. सतत कोणीतरी आपल्याला जज करतंय हा विचार करत जगणं कलाकारांसाठी विशेषत: अभिनेत्रींसाठी किती कठीण आहे.” आता यावर सिनेविश्वातून अजून कोण ऐश्वर्याची बाजू घेत त्यांच्या पाठीशी उभं राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे…
================================
हे देखील वाचा : चक्क Salman Khan याला ऑफर केली होती ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका!
================================
दरम्यान, रेणूका शहाणेच्या चित्रपटांबदद्ल बोलायचं झालं तर, १९९२ मध्ये ‘हाच सुनबाईचा भाऊ’ या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाची सुरुवात केली होती… तसेच, १९९३ मध्ये तिने ‘मनी’ या तेलुगु चित्रपटातून तेलुगु फिल्म इंडस्ट्री आणि ‘हम आपके है कौन!’ मधून हिंदीत डेब्यु केला होता… पुढे ‘अबोली’, ‘मासूम’, ‘दिल ने जिते अपना कहा’, ‘रिटा, ‘गुलाबजाम’, ‘स्माईल प्लीज अशा बऱ्याच हिंदी,मराठी चित्रपटांमध्ये तिने कामं केली आहेत….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi