“लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच”; Renuka Shahane यांनी सांगितली

“लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच”; Renuka Shahane यांनी सांगितली जुनी आठवण
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील बरेच ताकदीचे कलाकार फार लवकर हे जग सोडून गेले… त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)… रंगभूमीवर ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या लक्ष्मीकांत यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले… सलमान खान, शाहरुख खान यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या लक्ष्मीकांत यांच्यासोबत अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी काम करण्याचा अनुभव कसा होता हे शेअर केलं आहे… नेमकं काय म्हणाल्या रेणूका जाणून घेऊयात…(Renuka Shahane)

सध्या रेणूका शहाणे त्यांच्या आगामी उत्तर चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत… यात त्यांच्या मुलाची भूमिका अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे याने साकारली आहे… आणि रेणूका शहाणे यांनी लक्ष्मीकांत यांच्यासोबत ‘हम आपके है कौन!’ (Hum Aapke Hai Kaun!) चित्रपटात काम केलं होतं.. जुन्या आठवणींना उजाळा देताना सकाळ प्रीमियरशी बोलताना रेणूका म्हणाल्या की, अभिनयच्या निमित्ताने बेर्डेंच्या तिसऱ्या पिढीबरोबर काम करतेय… ‘उत्तर’ या चित्रपटात अभिनय माझ्याबरोबर काम करतोय, हे कळलं तो क्षण माझ्यासाठी भावनिक होता. त्याच्याबरोबर काम करताना मला हे जाणवलं की, एक वर्तुळ पूर्ण झालं आहे.” (Entertainment News)

पुढे त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंची जुनी आठवण सांगत असं म्हटलं, “माझ्या मराठी चित्रपटाची सुरूवात ही लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर झाली आहे. एका चित्रपटात मी लक्ष्मीकांतची हिरोईन होते. मग ‘हम आपके है कौन’मध्ये मी त्याची वहिनी होते. त्यामुळे आमचं नातं खूपच सुंदर होतं. लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच वागवायचा. इतकंच नाही मी बेर्डेंच्या तिन्ही पिढ्यांबरोबर काम केलं आहे.” (Bollywood)

यापुढे रेणुका म्हणाल्या, “मी प्रिया बेर्डेच्या (Priya Berde) आई लता अरुण यांच्याबरोबरही काम केलं आहे. त्या स्वभावाने खूपच गोड होत्या. तेव्हा मला माहीत नव्हतं की, मी पुढे जाऊन त्यांची मुलगी प्रिया आणि लक्ष्मीकांत यांच्याबरोबर काम करेन. आम्ही भेटलो तेव्हा अभिनय मला म्हणाला की, ‘मी तुझ्याबरोबर काम करणारी बेर्डेंची दुसरी पिढी आहे’. त्यावर मी त्याला म्हणाले की, ‘नाही… मी तुझ्यानिमित्ताने बेर्डेंच्या तिसऱ्या पिढीबरोबर काम करत आहे’. अभिनय बेर्डेबरोबर काम करणं हा अनुभव खूपच छान होता.”
================================
हे देखील वाचा : “चांगलं बोलता येत नसेल तर… “, ऐश्वर्या रायच्या ट्रोलिंगवरुन संतापली Renuka Shahane
================================
रेणूका शहाणे यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, नुकत्याच त्या देवमाणूस’ चित्रपटात महेश मांजरेकर यांच्यासोबत दिसल्या होत्या… आता आगामी उत्तर चित्रपटात आत्ताच्या काळातील आई-मुलाची जोडी आणि त्यांच्यातील नातं प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi