Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

मराठीसाठी झगडणाऱ्या रेणुका शहाणे का चर्चेत आहेत?
महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांसाठी सुरू असलेला संघर्ष अजूनही थांबायच नाव घेत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताच मराठीचा मुद्दा हाती घेतला, बरीच आंदोलनं केली.
परिस्थिती तेवढ्यापुरती सुधारली खरी पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठीला आणि मराठी भाषिक लोकांना डावललं जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे.
नुकतंच मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही अशा अर्थाची एक पोस्ट एचआर रीक्रूटरने केली होती.
मुंबईतील एका कंपनीतील ग्राफीक डिझायनर या पदासाठी भरती सुरू होती आणि यासंदर्भातच एक पोस्ट शेयर करण्यात आली. यामध्ये या नोकरीसाठी मराठी व्यक्ति चालणार नसल्याचं स्पष्टपणे लिहिण्यात आलं होतं.
ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आणि सर्वच स्तरातून यावर टीका व्हायला सुरुवात झाली. ही पोस्ट करणाऱ्या एचआर रीक्रूटरने माफी जारी मागितली असली तरी आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. वेगवेगळी लोक या प्रकरणावर त्यांची मतं मांडली आहेत.
इतकंच नव्हे तर नुकतंच घाटकोपरच्या एका गुजराती बहुल सोसायटीमध्ये मराठी लोकांना प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली. यामुळे पुन्हा मराठी विरुद्ध गुजराती किंवा मराठी विरुद्ध इतर भाषिक असा वाद मुंबईत रंगताना दिसत आहे.
या दोन्ही घटनांवर प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक पोस्ट लिहिली जी सध्या चांगलीच चर्चेत आली.

आपल्या पोस्टमध्ये रेणुका लिहितात, “मराठी “not welcome” म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका.”
एक्स या प्लॅटफॉर्मचा वापर करून रेणुका यांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ट्या पुढे लिहितात, “कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे.” रेणुका शहाणे यांच्या या पोस्टची प्रचंड चर्चा होत आहे. सोशल मीडियावर यावर उलटसुलट प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहे.
रेणुका शहाणेंनी या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी विविध कमेंट केल्या आहेत. कित्येकांनी अभिनेत्रीने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
एका युजरने मराठी भाषा मराठी संस्कृती व आपली मुंबई वाचवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आभार मानतो असे म्हटले आहे. तर, रेणुका यांच्या या पोस्टला काहींनी विरोधही केला आहे. आशुतोष राणा आणि तुम्ही मराठीत किती काम करतात? हे जरा सांगाल का? असा प्रश्न एकाने केला आहे. तर, काही युजर्सचा रोख हा भाजपविरोधात भूमिका का घेतली? असाही आहे.
हेदेखील वाचा : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने कलाकारांना लावली ‘Vantiy Van’ची सवय
एकूणच या वादाला राजकीय वळणही मिळत असल्याचं दिसत आहे. नुकतंच चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त करत त्यांना एक पत्र लिहिलं आहे.

हे पत्र शेयर करत चित्रा वाघ यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर रेणुका शहाणे यांना टॅग करत लिहिलं, “ज्यांनी मुंबईकर कोरोनाच्या संकटात असताना करोडो रूपये लुटून खाल्ले आणि मराठी शाळांना टाळे लावले मात्र उर्दू भवन बांधण्यासाठी अतिउत्साह दाखवला अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का..? यावर उघड भूमिका घेणार की राजकीय विषय म्हणून बगल देणार..?”
रेणुका शहाणे यांच्या या पोस्टवरुन वातावरण चांगलंच तापलं असून याला एक राजकीय रंगही देण्यात काही लोकांनी हातभार लावला आहे.
अद्याप चित्रा वाघ यांनी लिहिलेल्या पत्राला रेणुका शहाणे यांच्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही. या प्रकरणाला आता त्या पूर्णविराम कसा देणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.