Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Rinku Rajguru : “आपलं मुळ कधी विसरु नये”; २० वर्षांनी वडिलांसोबत वारीत झाली दंग!
सर्वत्र विठूरायाच्या गरजाने आसमंत दुमदुमला आहे… लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळेच पायी वारीने जात विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग आहेत… दरवर्षी वारीत सामान्यांसह कलाकार मंडळी देखील सहभागी होत याची देही याची डोळा विठ्ठलाची भक्ती अनुभवत असतात… यंदाच्या वारीत तब्बल २० वर्षांनी रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) सहभागी झाली असून वडिलांसोबत फुगडी खेळताना दिसली…(Marathi Entertainment News)

‘सैराट’ (Sairat Movie) फेम अभिनेत्री रिंकु राजगुरु ४ वर्षाची असताना वारीत सहभागी झाली होती… त्यानंतर आता २० वर्षांनी पुन्हा वडिलांच्या साथीने वारकऱ्यांसोबत अभंग गात आणि विठूरायाच्या नामस्मरणात दंग झाली होती.. वारीत टाळ-मृदुंगाच्या तालावर मग्न झालेल्या रिंकूने सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे… रिंकूने लिहिलं आहे की,”जय जय राम कृष्ण हरी…हा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता. मी ४ वर्षांची असताना पहिल्यांदा बाबांसोबत वारी अनुभवली होती. आता २० वर्षांनंतर मी पुन्हा बाबांसोबत तेच क्षण अनुभवले. आपलं मूळ कधीच विसरु नये.” रिंकूच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सच्या वर्षाव झाला आहे.(Entertainment)
================================
=================================
दरम्यान, रिंकु राजगुरुच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर २०१६ मध्ये आलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने रातोरात रिंकूला स्टार केलं… त्यानंतर बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक इतिहास रचणाऱ्या ‘सैराट’चे इतर भाषेत रिमेक झाले पण मराठीतला सैराटच बाजी माररुन गेला… रिंकूने सैराटच्या यशानंतर ‘कागर’, ‘झुंड’, अनकही कहानियां आणि ‘झिम्मा २’ या चित्रपटात कामं केली..लवकरच जिजाई, खिल्लार या चित्रपटातून ती नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे…(Rinku Rajguru Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi