Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड एन्ट्री!
सध्या एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत… मराठी, हिंदी, तमिळ, कन्नडा अशा सर्वच प्रादेषिक भाषेतील दर्रेदार कलाकृती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत… अशातच ऋषभ शेट्टी लिखित-दिग्दर्शित आणि अभिनित कांतारा : अ लेजेंड – चॅप्टर १ (Kantara 1) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे… जाणून घेऊयात २०२५ या वर्षात पहिल्या दिवशी कमाई करणाऱ्या चित्रपट आणि त्यांच्या कमाईबद्दल…(Indian film industry)

ऋषभ शेट्टीच्या कांतारा १ चित्रपटाच्या हिंदी वर्जने बॉलिवूडच्या टॉप कलाकारांच्या चित्रपटांना मागे टाकलं आहे… विशेष म्हणजे या कन्नडा चित्रपटाने देशभरात एक नवा रेकॉर्ड देखील केला आहे… ‘कांतारा १’ च्या हिंदी वर्जनने पहिल्या दिवशी १९.२५ कोटी कमावले असून इतर भाषांमधील कलेक्शन एकत्रित करुन ‘कांतारा १’ पहिल्या दिवशी ६० कोटी कमावले आहेत… २०२२ मध्ये रिलीज झालेल्या कांतारा चित्रपटाचाच रेकॉर्ड या प्रीक्वेलने मोडला आहे… आता वळूयात बॉलिवूड चित्रपटांच्या First Day Collection कडे… (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!
=================================
ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘वॉर २’ (War 2) ने पहिल्या दिवशी ५२.५ कोटी कमावले होते… तर लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनित ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटाने ३३.१० कोटींची कमाई करत ओपनिंग केली होती… यानंतर येतो सलमान खानचा ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपट ज्याने पहिल्या दिवशी ३०.६ कोटी कमावले होते… तर, ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) या मल्टिस्टारकास्ट चित्रपटाने २४.३५ कोटी, ‘सैय्यारा’ने (Saiyaara) २२ कोटी, ‘रेड २’ ने १९.७१ कोटी, ‘स्काय फोर्स’ने (Saky Force) १५.३० कोटी, ‘जॉली एल.एल.बी ३’ ने (Jolly LLB 3) १२.५ कोटी, सितारे जमीन पर ने १०.७ कोटी पहिल्या दिवशी कमावले होते…(Bollywood movies)
आता ‘कांतारा १’ चित्रपट देशभरात ५०० कोटींचा टप्पा पार करेल का? आणि कन्नड चित्रपटसृष्टीला आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट असेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi