Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Rishi Kapoor : ‘डफली वाले डफली बजा…’ हे गाणे सिनेमातून काढून टाकणार होते!
काही गाण्याचं भाग्य थोर असतं. थोर शब्द या साठी की अगदी हे गाणं सिनेमातच नकोच म्हणून काढण्यापर्यंत सर्वांच जवळ जवळ एकमत झालं होतं. पण संगीतकाराच्या आग्रहासाठी हे गाणं सिनेमात ठेवलं आणि काय सांगता….या गाण्याने धुमाकूळ घातला व सिनेमा सुपर डुपर हिट व्हायला हेच गाणं कारणीभूत ठरलं! तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही. हा किस्सा १५ सप्टेंबर १९७९ रोजी पडद्यावर आलेल्या ’सरगम’ या सिनेमातील एका गाण्याचा आहे. (entertainment)

हा सिनेमा अनेक अर्थाने महत्वपूर्ण होता. दाक्षिणात्य अभिनेत्री जयाप्रदाचा हा पहिला हिट हिंदी सिनेमा होता. डिस्को युगाच्या नांदी वर्षात अस्सल भारतीय संगीताचा नजराना देणारा हा सिनेमा होता. मूलत: हा सिनेमा १९७६ साली तेलुगू भाषेतील ‘सिरि सिरि मुव्वा’ या सुपर हिट सिनेमाचा रिमेक होता. दिग्दर्शक होते के विश्ननाथ, त्यांनीच मूळ तेलगू सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या तेलगू आवृत्तीत जयाप्रदा व चंद्रमोहन ही जोडी होती तर संगीत के व्ही महादेवन यांचे होते. हिंदीत जेंव्हा हा सिनेमा आणायचा ठरवले त्यावेळी नायिका तीच ठेवून म्युझिकल रोमॅंटीक हिरो म्हणून ऋशी कपूरला घेण्यात आले.गाणी आनंद बक्षी यांची तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच होतं. (Tollywood and Bollywood movies)

आता येऊयात मूळ गाण्याकडे. ’डफली वाले डफली बजा’ हेच गाणं खर तर या सिनेमाची आजही ओळख आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल हे गाणं सुरूवातीला निर्माता,दिग्दर्शक कुणालाच आवडलं नव्हतं. त्यांच्या मते या गाण्याचे शब्द खूपच हलक्या प्रतीचे,काम चलावू व स्वस्त आहेत. या सिनेमातील इतर गाणी पाहता (“पर्बत के इस पार”, “कोयल बोली दुनिया डोली”, “मुझे मत रोको मुझे गाने दो”, “रामजी की निकली सवारी”, “हम तो चले परदेस”, “कहाँ तेरा इंसाफ़”) काही अंशी ते खरंही होतं. या गाण्याचे शूट करायला देखील तयार नव्हते. दिग्दर्शकाच्या मते सिनेमात भरपूर गाणी झाली आहेत. सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं होतं. अक्षरशः शूटिंग च्या शेवटच्या दिवशी या गाण्याचे चित्रीकरणाचा निर्णय झाला. (Rishi Kapoor And Jaya prada)

मध्यंतरी सारेगामा शो मध्ये अभिनेत्री जयाप्रदा आली होती तेव्हा तिने या गोष्टीचा खुलासा केला. अवघ्या एका दिवसात या संपूर्ण गाण्याचे शूट उरकले गेले. शूट तर झाले पण या गाण्याला सिनेमात कुठही जागा मिळात नव्हती. संगीतकार एल पी मात्र कायम हे गाणं सिनेमात समाविष्ट करावे याचा आग्रह करीत होते. या गाण्याला रसिकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळेल याचा त्यांना विश्वास होता. शेवटी हो नाही हो नाही करत करत सिनेमा संपायच्या वीस मिनिटे आधी हे गाणं अक्षरश: घुसवण्यात आलं. कारण इतरत्र कुठे त्याला सिच्युएशन नव्हती; जागा तर अजिबात नव्हती. सिनेमा रिलीज झाला आणि पब्लिकने डोक्यावर घेतला.आणि सर्वात लोकप्रिय झालं डफली वाले…. या गाण्याने रेकॉर्ड ब्रेक अशी लोकप्रियता मिळवली. त्या वर्षीचं ते बिनाका टॉपचं गाणं होतं तर एल पीं ना फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. ऋशी कपूरचं तर ते सिग्नेचर सॉंग बनलं.स्टुडंट ऑफ द इयर (२०१२) य अलीकडच्या मध्ये तो हेच गाणं गाताना दाखवलाय! (Bollywood movies)
=============
हे देखील वाचा : Raj kapoor मध्यरात्री दोन वाजता गीतकार शैलेंद्र यांच्या घरी का पोहोचले?
=============
जयाप्रदा आणि ऋषी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट होता सुपरहिट झाल्याने साहजिकच या जोडीकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील वाढल्या होत्या परंतु दुर्दैवाने हा त्यांचा एकमेव सुपरहिट सिनेमा ठरला. यानंतर घरघर की कहानी, घराना आणि पराया घर या तीन चित्रपटात ते एकत्र आले पण यापैकी एकाही चित्रपटाला सरगम सारखे यश मिळू शकले नाही. (Entertainment tadaka)